दलीत युवक मारहाण प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षेची मागणी…….
२६ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील,श्रीरामपूर तालुक्यातील,हारेगाव मधील अल्पवयीन दलीत मुलांना अमानुष पणे मारहाण केल्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाही करणे बाबत निवेदन देण्यात आले. युवक जिल्हा अध्यक्ष नीलेश भाई उन्हवने,यांच्या मार्गदर्शनखाली व युवक शहराध्यक्ष नाशिकरोड धीरज अशोकराव उन्हवने,यांच्या अध्यक्षते खाली महसूल आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी पक्ष्याचे शहर अध्यक्ष रवींद्र पगारे, देवेंद्र चव्हाण, बाळा उन्हवने, सुभाष खरात, श्रीकांत उन्हवने, रणजित अहिरे, प्रथम शरकर, आकाश चंद्रमोरे, निखिल ढाकणे, आदी उपस्थित होते.