Home ताज्या बातम्या एकलहरा औष्णिक विद्युत केंद्रात पांढऱ्या राखेचा काळाबाजार, स्थानिकांना होतोय राखेचा त्रास, अधिकारी...

एकलहरा औष्णिक विद्युत केंद्रात पांढऱ्या राखेचा काळाबाजार, स्थानिकांना होतोय राखेचा त्रास, अधिकारी बसले बिंदास्त

0

एकलहरा औष्णिक विद्युत केंद्रात पांढऱ्या राखेचा काळाबाजार, स्थानिकांना होतोय राखेचा त्रास, अधिकारी बसले बिंदास्त..

 

नाशिक, एकलहरा औष्णिक विद्युत केंद्रातील निर्माण होणाऱ्या राखेच्या वाहतूक करणाऱ्या गाड्यांपासून स्थानिक नागरिकांना होणारा त्रास यासंबंधी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष शशिभाई उन्हवणे यांच्या नेतृत्वात स्थानिक नागरिकांनी एकलहरा औष्णिक विद्युत केंद्र मुख्य अभियंता पुणेकर साहेब यांना निवेदन देऊन चर्चा केली. व त्यांना राखेची वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड भरलेल्या गाड्यांपासून स्थानिक लोकांना होणारा त्रास यावर लक्ष वेधले. आणि कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. याच आशयाचे निवेदन महसूल उपआयुक्त रमेश काळे यांना देखील पक्षाच्यावतीने स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत देण्यात आले.

लवकरच यावर आपण चौकशी करावी व संबंधित अधिकारी व सिक्युरिटी यांच्यावर कडक कारवाई करावी. अशी मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, राखेने ओव्हरलोड भरलेल्या गाड्या क्षमतेपेक्षा जास्त भरून अनधिकृतपणे राखेच्या धरणामधून बाहेर पडतात. यावर अधिकारी आणि सिक्युरिटी कानाडोळा करतात. नंतर याच गाड्या बाहेर खाली करून अंडर लोड करून वजन केल्या जातात आणि शासनाची फसवणूक करून महसूलाची चोरी करतात. यात अधिकारी वर्ग देखील सामील आहेत. याच गाड्या ओव्हरलोड रस्त्यावर वाहतूक करताना राख सतत उडत असते. यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या आणि रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या रहिवाशांना या राखेचा प्रचंड त्रास होत आहे. बऱ्याच लोकांना फुफुसाचे आणि डोळ्यांचे विकार चालू झाले आहे. त्यात पावसाचे दिवस असल्यामुळे रस्त्यावर राखेचा चिखल होतो त्यातून मोटरसायकलचे होणारे अपघात नेहमीचेच झाले आहे.

गावातील लहान रस्त्यांवर आणि शहरातील रस्त्यांवर या मोठ्या गाड्यांमुळे दिवसा रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. एका गाडीला समोर वेगळा व मागे वेगळा असे दोन नंबर असल्यामुळे अपघाता नंतर गाडीची तक्रार देखील कुठल्या नंबरची करावी हा देखील प्रश्न आहे. या सगळ्या बाबी एकलहरा औष्णिक विद्युत केंद्र येथील अधिकाऱ्यांना व सिक्युरिटींना चांगल्याच माहित आहे. तरीदेखील ते यावर जाणून बुजून दुर्लक्ष करतात. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण व भ्रष्टाचार होत आहे. काही मोजक्या व्यवसायिकांशी वरिष्ठ अधिकारी हात मिळवणी करून. आपले खिशे भरत आहे. लवकरच स्थानिक नागरिकांच्या वतीने या समस्येवर पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे यांच्या नेतृत्वात एकलहरा औष्णिक विद्युत केंद्र कार्यालय. येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणार आहे.

 

असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी शिष्टमंडळात मुक्ताताई खर्जुल, मिना शिंदे, सविता चंद्रमोरे, भाग्यश्री जाधव, मिनाझ सैयद, रामा शिंदे, साराभाई वेळूंजकर, भागवत डोळस, राज निकाळे, रवी पगारे आदी स्थानिक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version