Home ताज्या बातम्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने लोककवी वामनदादा कर्डक जयंती व स्वातंत्र्य दिन साजरा...

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने लोककवी वामनदादा कर्डक जयंती व स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला

0

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नाशिकरोड या ठिकाणी महाकवी वामनदादा कर्डक जयंती व स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांनी शोषित कलावंतांसाठी वामनदादांच्या गाण्यांना आणि काव्याना गायनातून आंबेडकरी विचारांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.यात अनेक कवी गायक व कलावंतांनी वामनदादांचे गाणी गाऊन त्यांना अभिवादन केले.यावेळी प्रख्यात गायक कवींच्या वतीने वामन दादांच्यासहित सर्व महापुरुषांना पुष्प अर्पण केले,यावेळी महाराष्ट्राचे नावाजलेले कवी व गायक रंगराज ढेंगळे,सोमनाथ गायकवाड,जयपाल धिवरे,हर्षेंद्र जाधव,दीपक शिंदे,शिरीष गांगुर्डे,रवी वाघमारे,युवराज शिंदे,रोहित उन्हवणे,संजय उन्हवणे,सुनील उन्हवणे,विकी उन्हवणे,अनिल जगताप,भारत भालेराव,संकेत गांगुर्डे,स्वप्नील गायकवाड व इतर कलावंतांनी सहभाग दिला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी,जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे,महेश भोसले,रवी पगारे,प्रवीण कर्डक,नंदू जाधव,प्रशांत कर्डक,आनंद पगारे,विकी पगारे,हर्षल मोरे,आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version