अंबड पोलीसांची उत्कृष्ठ कामगिरी गावठी कट्टा बाळगणारा इसम मुद्देमालासह ताब्यात…….
नाशिक शहर व परीसरात प्राणघातक शस्त्र तसेच अग्नीशस्त्र बाळगणा-या इसमांचा शोध घेत असतांना अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हेशोध पथकाचे संदिप भुरे यांना गोपनिय बातमी मिळाली की, म.न.पा. शाळा, गणेशचौक, सिडको, नाशिक येथे बेदायदेशीररित्या विनापरवाना एकजण गावठी कट्टा त्याचे कंबरेस लावून उभा आहे त्वरित गुन्हे शोध पथकाचे पोलिस उप निरक्षक नाईद शेख, सागर जाधव, घनशाम भोये, यांनी सापळा रचुन संशयित राजन कुमार गुलाबचंद कहार वय ४१ वर्ष, रा. गणेश रोबंगलो नं.०४, प्रसन्न नगर, पाथर्डी फाटा याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडतीत कंबरेस एक लोखंडी गावठी बनावटीची पिस्टल लावलेली असलेली मिळुन आल्याने त्याला ताब्यात घेवुन त्याचे कडुन ४०,०००/- रू. किंमतीची लोखंडी गावठी बनावटीची पिस्टल हस्तगत करून त्याचे विरोधात अंबड पोलीस ठाणे, नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उप आयुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक अशोक नजन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस उप निरीक्षक नाईद शेख, पवन परदेशी, सचिन करंजे, राकेश राऊत , समाधान शिंदे, प्रविण राठोड, सागर जाधव, घनशाम भोय, अनिल गाढवे, राकेश पाटिल करीत आहेत. सदर गुन्हयाचा पुढिल तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमिला कावळे या करीत आहेत.