हॉटेलचे बिल करून देण्यासाठी मागितली लाच…….लाच स्वीकारताना अजून एक लाचखोर अधिकारी सापळ्यात…….
लाचखोर अधिकाऱ्यांच्या यादीत एक नाव अजून समोर आले असून नाशिकच्या आदिवासी एकात्मिक प्रकल्प लेखाधिकारी भास्कर राणोजी जेजुरकर यांना 10 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत होस्टेल चालवल्या जाणाऱ्या हॉस्टेलचे चार लाखा 60 हजार रुपयाचे बिल काढण्यासाठी 10 हजाराची लाच मागितली होती. प्रकल्प लेखाधिकारी जेजुरकर यांस त्याच्याच कार्यालयात लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. नाशिक शहरात वारंवार लाचखोर जाळ्यात अडकत असल्याने अजून किती लाचखोर नाशिक शहरात लपून बसले आहेत हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. भरगच्च अपगर, चांगल्या सुविधा, आरामात डुयुटी तरीही लाच मागण्याची सवय नागरिकांना त्रासदायक ठरत आहे.