Home क्राईम मुलाला चापट मारल्याचा जाब विचारला या भांडणावरून प्रेयीसीचा चाकू खुपसून खून……

मुलाला चापट मारल्याचा जाब विचारला या भांडणावरून प्रेयीसीचा चाकू खुपसून खून……

0

मुलाला चापट मारल्याचा जाब विचारला या भांडणावरून प्रेयीसीचा चाकू खुपसून खून……

भांडणे झाल्याने प्रियकराने प्रेयसीच्या पाठीत चाकू खूपसून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना हाेलाराम काॅलनीतील कस्तुरबा नगरात घडली आहे.
आरती श्याम पवार वय ४०, रा. कस्तुरबानगर, हाेलाराम काॅलनी, नाशिक असे मृत प्रेयसीचे नाव असून पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन संशयित प्रियकर श्याम अशाेक पवार वय ३२,रा. मल्हारखान, अशाेकस्तंभ याला अटक केली आहे. आरती हिचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला हाेता.

काैटुंबिक कारणातून तिचा पती तिला साेडून दुसरीकडे रहायला आहे. याच कालावधीत तिची ओळख श्याम पवार याच्याशी झाली. त्याचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर ती मुलांसह श्यामसाेबत राहत हाेती. दरम्यान, आरती व श्यामचे काहीना काही कारणातून खटके उडत हाेते. त्यातच मंगळवारी १५ ऑगस्ट रात्री नऊ वाजता श्याम याने कस्तुरबा नगरातील घरी असताना मुलाला चापट मारली. त्यातून आरतीने श्यामला विचारणा केली असता दाेघांत भांडणे झाली. त्याचवेळी संतापाच्या भरात श्यामने किचनमधील धारदार सुरी तिच्या पाठीत खुपसली. जखमी आरती हिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

 

जिल्हा रुग्णालयात यांनी शवचिकित्सा केली असता आरतीच्या पाठीत एक छाेटी जखमी दिसली. त्यामुळे तिचा मृत्यू नैसर्गिक नसून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले. अधिक तपास सहायक निरीक्षक विष्णू भाेये करत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version