इंडिया सिक्युरिटी प्रेसवर आतंकवादी हल्ल्याचा प्रयत्न…… पोलिसांच्या तत्पर कारवाईने दोन अतिरेकी ठार….. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वूभूमीवर आतंकवादी हल्ला झाल्यास त्या निमित्ताने घेण्यात आले मॉक ड्रिल ……
स्वातंत्र्य दिनाच्या चार दिवस असताना नाशिकरोड येथील इंडिया सेक्युरिटी प्रेसवर गुरुवारी आतंकवादी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हल्ल्याची खबर मिळताच इंडिया सिक्युरिटी प्रेस ची सी आय एस एफ, नाशिक रोड पोलिस, बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्याची बातमी पसरताच प्रेस कामगार आणि नागरिकांमध्ये परिसरात एकच खळबळ उडाली आणि भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले.
इंडिया सिक्युरिटी प्रेस अगदी जवळ महसूल आयुक्त, फॅमिली कोर्ट, वाहतूक शाखेचे कार्यालय आणि इतर महत्वाचे कार्यालय असल्याने नागरिकांची या ठिकाणी वर्दळ असते, प्रेस कामगारांना प्रेस मध्येच थांबविण्यात आले. प्रेसच्य पोस्ट ऑफिस भागात हल्ला करण्यात आले होते. दंगा नियंत्रण पथक आणि बॉम्ब शोधक पथकाने आतंकवादी हल्ल्याचा परिसर सील करून संपूर्ण विळखा घातला. नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या कमांडो, बॉम्ब शोधक पथक, नाशिक रोड पोलिस, इंडिया सिक्युरिटी प्रेस चे सी आय एस एफ ने आतंकवाद्यांच्या शोध घेण्यास सुरुवात केली.
श्वान पथक अल्फा यालाही पाचारण करण्यात आले. अतिरेकी हे सिक्युरिटी प्रेस मध्ये घुसणार होते परंतु त्यांना त्या अगोदरच सिक्युरिटी प्रेस जवळ असलेल्या पोस्ट ऑफिसच्या परिसरात घेरण्यात आले. पोस्ट ऑफिस भागात आतंकवादी लपून असल्याचे नक्की झाल्यानंतर संपूर्ण लक्ष त्या भागात केंद्रित करून आतंकवादी लपून बसलेल्या ठिकाणी झालेल्या जटापटीत दोन आतंकवाद्यांना ठार करून कंठस्नान घातले तर त्यांचे दोन साथी दारांना पकडण्यात संयुक्त टीमला यश आले.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रेस कामगार व नागरिकांमध्ये खळबळ उडाली परंतु हे मॉक ड्रिल असल्याचे समजतात नागरिकांनी व प्रेस कामगारांनी सुटकेचा विश्वास सोडला. पोलीस आयुक्तालयाचे कमांडो, नाशिक रोड पोलिस, दंगा नियंत्रण पथक, बॉम्ब शोधक पथक आणि सिक्युरिटी प्रेसचे सीआयएसएफ यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोक ड्रिल घेण्यात आली.
मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा होणार असल्याने या पार्श्वभूमीवर मौकडरील करण्यात आले. पोलीस आयुक्तालयातील सुमारे 200 कर्मचारी व कमांडो त्याचप्रमाणे सीआयएसएफ चे जवान, बॉम्ब शोधक पथक, दंगा नियंत्रण पथकाने ही कामगिरी केली. यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद वाघ, नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, राखीव दलाचे हेमंत फड, हांडोरे मॅडम, व सुमारे 200 पोलीस कर्मचारी व कमांडर उपस्थित होते.