मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक,९० हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल जप्त
नाशिकरोड गुन्हे शोधपथकाची उत्तम कामगिरी
नाशिक रोड मोबाईल चोरीचे प्रकार दिवसेंदिवस परिसरात नाशिकरोड परिसरात वाढलेले असतानाच नाशिक रोड पोलिसांनी मोबाईल चोरणाऱ्या दोघा संशयीतांना शीताफिने अटक करून त्यांच्याकडून ९० हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल जप्त केले आहे या कामगिरीबद्दल नाशिकरोड गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक केले जात आहे.
गेल्या काही दिवसापासून नाशिक रोड परिसरात बाजारातून गर्दीच्या ठिकाणाहून तसेच बस स्थानक परिसरातून मोबाईल चोरी करण्याचे प्रमाण वाढले होते या संदर्भात नाशिकरोड पोलिसात नागरिकांच्या तक्रारी सुद्धा वाढल्या होत्या त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढले होते.
दरम्यान गेल्या शनिवार दिनांक पाच रोजी येथील सामनगाव रोड परिसरात राहणारे रमाकांत पासवान यांच्या घरातील उघड्या खिडकीतून मोबाईल चोरी गेला होता या संदर्भात त्यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती या तक्रारीनंतर संशयित चोरट्यांचा पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके हवालदार सुभाष घेगडमल यांना गुप्त माहिती मिळाली की संशयित चोरटे नाशिक रोड बस स्थानक परिसरात असल्याचे समजले त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके हवालदार सुभाष घेगडमल गुन्हे शोध पथकाचे आफताब शेख संदीप पवार मनोहर कोळी नाना पानसरे कल्पेश जाधव अरुण गाडेकर रोहित शिंदे यशराज पोतन आदींनी बस स्थानक परिसरात शोध घेतला असता त्यांना दोन संशयित फिरताना आढळले त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांचे नावे रोणा उर्फ रोहन सुभाष जाधव राहणार गाडेकर मळा देवळाली गाव नाशिक रोड व परवेज जतीफ पटेल राहणार जिया उद्दीन डेपो मालधक्का रोड नाशिक रोड असे असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले
त्याचप्रमाणे त्यांनी नाशिक रोड परिसरात ठीक ठिकाणी आठ मोबाईल चोरल्याचे कबूल केले असून पोलिसांनी हे मोबाईल त्यांच्याकडून जप्त केले आहे या मोबाईलची किंमत सुमारे ९० हजार रुपये इतकी आहे.दरम्यान या कामगिरीबद्दल नाशिक रोड पोलिसांचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ यांनी अभिनंदन केले आहे.