जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांची धोंगडे मळा, बिटको हॉस्पिटलला भेट…….. अधिकाऱ्यांना सूचना…… वाहनांचे नुकसान व जाळपोळ करणाऱ्यांची गय नाही……
वाहनांचे नुकसान व जाळपोळ करणाऱ्या गुंडांची यापुढे गय केली जाणार नाही अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादा भुसे यांनी दिली. नाशिक रोड येथील धोंगडे मळा परिसर व विहित गाव येथे गेल्या आठवड्यात गुंडांनी मध्यरात्रीच्या सुमारास वाहनांची जाळपोळ व काचा फोडून नुकसान करून दहशत पसरविली होती. घटनेनंतर उपनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करून वाहनांचे नुकसान व जाळपोळ करणाऱ्या गुंडांना अटक केली. तोडफोड प्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली मुद्दा राज्याच्या विधानसभेत सुद्धा गाजला होता.
अधिवेशन संपताच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादा भुसे यांनी धोंगडे नगर येथे भेट देऊन तेथील नागरिकांशी चर्चा केली. यापुढे असे कृत्य करणाऱ्यांना पोलीस धडा शिकवतील तसेच ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर कठोर शासन करण्यात येईल आणि यापुढे अशा घटना घडणार नाही व रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवून गुंडावर कारवाई करावी याबाबत मंत्री दादा भुसे यांनी पोलिसांना सूचना दिल्या. त्यानंतर नामदार दादा भुसे यांनी महापालिकेच्या नवीन बिटको हॉस्पिटलला भेट देऊन तेथील समस्यांची पाहणी केली. समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून डॉक्टरांकडून काळजी घेतली जात नाही असा आरोप सुद्धा यावेळी उपस्थित असलेले माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे ज्योती कर्जुल ज्योती खोले हरीश भडांगे यांनी केला. यावेळी दादा भुसे यांनी बिटको हॉस्पिटल मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्यासोबत बैठक घेऊन अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या.
यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे महापालिका आयुक्त अशोक करंजकर त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे विजय पगारे त्याचप्रमाणे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते राजू लवटे बाबुराव आढाव गणेश कदम नितीन खर्जुल विक्रम कदम श्याम खोले शिवा ताकाटे आधी उपस्थित होते.