अंमली पदार्थ विरोधी पथकाची सिगरेटची साठवणुक व विक्री करणाऱ्यांवर कारवाई……
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरात सुरू असलेल्या गुन्ह्यांचा तपासासाठी स्थापन केलेल्या विविध पथकांची उत्कृष्ट कामगिरी सुरू असून अंमली पदार्थ विरोधी पथकातील चंद्रकांत बागडे यांना ०२ ऑगस्ट रोजी परमानंद खेमचंद सुभाष रोड, नाशिक रोड नाशिक येथे ईश्वर किशनचंद तारवाणी वय ५७ वर्षे, रा. हरेकृष्णा बंगलो, मारुती मंदिराजवळ, गंधर्वनगरी, नाशिक रोड याने त्याचे ताब्यात १८,८००/- रूपये किंमतीचा माल केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या सिगारेट पाकिटावर योग्य आकाराचे वैधानिक चित्र व वैधानिक इशारा नसलेल्या विदेशी सिगारेटची पाकिटे विक्रीकरीता ठेवून व विदेशी सिगारेटची विक्री करताना तपासात मिळुन आल्याने सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संशयित विरुद्ध भारतीय दंड कायद्याच्या कलम ७(१) (२) (३), २० प्रमाणे नाशिक रोड, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास नाशिक रोड पोलीस करत आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, सपोउनि. रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, संजय ताजणे, गणेश भामरे, नितीन भालेराव, डंबाळे, बळवंत कोल्हे, रविंद्र दिघे, अनिरूध्द येवले, बाळासाहेब नांद्रे, चंद्रकांत बागडे, योगेश सानप, गणेश वडजे, अविनाश फुलपगारे, अर्चना भड यांनी कामगिरी केलेली आहे.