घरफोडीच्या गुन्हयातील सराईत आरोपी खंडणी पथकाच्या ताब्यात……
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात घडलेल्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याच्या दृष्टीकोनातुन विशेष मोहीम राबविली आहे. सदर मोहीम अंतर्गत गुन्ह्याचा तपास आणि आरोपींचा शोध सुरू असताना सराईत गुन्हेगार लक्ष्मण ऊर्फ गब्बुलक्ष्या अंकुश गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकुण ०८ गुन्हयातील फरार आरोपी लक्ष्मण हा गुन्हे करून गेल्या ५ वर्षापासून फरार होता.
खंडणी विरोधी पथकाची टीम फरार लक्ष्मण उर्फ गब्बुलक्ष्या अंकुश गायकवाड हा ०३ ऑगस्ट रोजी सिन्नरफाटा, नाशिक येथे येणार असल्याची खबर दत्तात्रेय चकोर व भगवान जाधव यांना मिळाली होती. खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावुन आरोपी लक्ष्मण उर्फ गब्बुलक्ष्या अंकुश गायकवाड, वय ३३ वर्षे, रा. सुंदर यांचे घरात भाडयाने, राजवाडा, पळसे याला सिन्नरफाटा येथुन शिताफीने ताब्यात घेऊन अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शना खाली खंडणी विरोधी पथकातील पोलिस निरीक्षक विदयासागर श्रीमनवार, सहायक पोलिस निरीक्षक प्रविण सुर्यवंशी, पोलिस उप निरीक्षक दिलीप भोई, सहायक पोलिस उप निरीक्षक दिलीप सगळे, किशोर रोकडे, राजेश भदाणे, योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, भुषण सोनवणे, मंगेश जगझाप, जाधव व सविता कदम यांनी केलेली आहे.