रोडरोमिओ व टवाळखोरांना पोलिसांचा दणका……
शहरातील शाळा, कॉलेज, बाजारपेठ आणि इतर वर्दळीच्या ठिकाणी रोड रोमियो आणि टवाळखोर मुलींना आणि महिलांची छेड काढत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या त्वरित ऍक्शन मोड मध्ये येत पोलिसांनी 01 ऑगस्ट रोजी रोडरोमिओ यांच्यावर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली होती. मोहिमे दरम्यान एकुण 71 व्यक्तीवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 112 / 117 अन्वये कारवाई करण्यात आली त्याचबरोबर नाशिक शहरातील शाळा महाविदयालय परिसरातील शंभर मिटर अंतरावरील ज्या पानटप-यांवर प्रतिबंधीत असलेला गुटखा, सिगारेट, तंबाखु विक्री होतांना आढळुन येणाऱ्या पानटपरी चालकांवर धूम्रपान करणा-या व्यक्तींवर कायदयाअंतर्गत एकूण 37 कारवाया करण्यात आल्या अशा प्रकारे रोड रोमिओ व धुम्रपान करणा-या वाक्ती यांचे विरुध्द एकूण 108 कारवाया करून नाशिक शहर पोलीसांनी रोड रोमियोंना चांगलाच दणका दिला आहे. यापुढेही नियमीत अशा प्रकारच्या कारवाया चालू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.