नाशिक येथील महात्मा गांधी रोड वरील दुकानदारांचा लाक्षणिक बंद……. वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात बंद पुकारला …….
नाशिक येथील महात्मा गांधी रोड हा अत्यंत गजबजलेला परिसर आणि बाजारपेठ आहे. एम जी रोड येथे मोठ मोठे कार्यालय, हॉटेल्स, दुकाने असल्याने तसेच सी बी एस जिल्हाधिकारी कार्यालय पोलिस आयुक्तालय याठिकाणी जाण्यासाठी मुख्य रस्ता असल्याने वाहनांची गर्दी असते. याठिकाणी येणाऱ्या नागरिकांचा आणि वाहनांचा मोठा व्याप असतो त्यातच यापरिसरत जुनी बिल्डिंग असून त्यात पार्किंगची सुविधा जेमतेम असल्याने बहुतेक दुचाकी चार चाकी वाहने या रस्त्यावरच पार्किंग होत असतात. रस्त्यांवरील पार्किंगमुळे याठिकाणी अनेकदा वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी ग्राऊंडवर पार्किंग सुविधा करण्यात आली होती पण पंधरा दिवसातच त्या ठिकाणी पार्किंग मनाई केली. वाहतूक पोलिस येलो लाईन बाहेर वाहने पार्क केल्यास दंडाची सुरुवात केल्याने नागरिकांनी आणि दुकानदारांनी रोष व्यक्त करत आपली दुकाने बंद केली. एम जी रोड येथे येलो लाईन होती परंतु फूटपाथ झाल्याने येलो लाईन ची जागा फारच छोटी असल्याने कुठलीही वाहने पार्क केल्यास त्या येलो लाईन बाहेरच येणार आहेत. शासनाने एम जी रोड येथे वाहतुकीचे आणि पार्किंगची योग्य नियोजन होत नाही तोपर्यंत कारवाई करू नये अशी मागणी दुकानदारांनी केली आहे. पुन्हा पुन्हा याठिकाणी येणाऱ्या ग्राहकांवर कारवाई होत असल्याने येथील व्यवसायावर परिणाम होत आहे. शासनाने त्वरित काही उपाय योजना कराव्यात अन्यथा लाक्षणिक बंद पुकारण्यात येणार असल्याचे आवाहन दुकानदारांनी केले आहे.