Home क्राईम मोटार सायकल चोरीचे दोन गुन्हे २४ तासात उघड…… पंचवटी गुन्हे शोध पथकाची...

मोटार सायकल चोरीचे दोन गुन्हे २४ तासात उघड…… पंचवटी गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी

0

मोटार सायकल चोरीचे दोन गुन्हे २४ तासात उघड……पंचवटी गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी …….

पंचवटी पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने पंचवटी आणि भद्रकाली पोलिस ठाण्यात दाखल मोटार सायकल गुन्ह्याचे 24 तासात उलगडा करून उल्लेखनीय कामगिरी करीत आरोपीला अटक केली आहे.
पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित केदार व सहायक पोलिस निरीक्षक मिथुन परदेशी व पथकाने गुन्हे उघड केले. गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित केदार व पथकातील अंमलदार तपास करीत असतांना रोहित केदार, जाधव व पवार यांना गोपनीय माहीती मिळाली की मोटार सायकल चोरी करणारा गोदाघाट पंचवटी येथे येत आहे.

गोपनिय माहितीच्या आधारे गुन्हेशोध पथकाचे कुलकर्णी, शिंदे, भोईर, मालसाने, पlजाघव, पवार, पवार, साबळे आदींनी पंचवटी गोदाकाठ येथून संजय शिवाजी महाळसकर या संशयितास मोटार सायकल क्रमांक एम एच १५ जी क्यु ३४१६ सह ताब्यात घेतले. तपास करताना आरोपी संजय शिवाजी महाळसकर याने भद्रकाली परिसरात देखील मोटार साकलय चोरी केल्याचे सांगितल्याने त्याच्या कळून टिव्हीएस कंपनीची स्कुटी पेप मो.सा. एम एच १५ जी. एन. ७६१४ हि हस्तगत करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रोहित केदार, सहायक पोलिस निरीक्षक मिथुन परदेशी, सागर कुलकर्णी, अनिल गुंबाडे, दिपक नाईक, कैलास शिंदे, महेश नांदुर्डीकर, निलेश भोईर, राकेश शिंदे, विष्णु जाधव, संतोष पवार, गोरक्ष साबळे, श्रीकांत साळवे, नितीन पवार, कुणाल पचलोरे, वैभव परदेशी, श्रीकांत कर्पे, कैलास वाकचौरे यांनी पार पाडली आहे.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version