नाशिक शहरात गुंडांवर हद्दपारीची कारवाई…….
पोलीस आयुक्तालय हद्दीत ठार मारणे, नागरिकांची लुटमार, मारहाण, दुखापत व दहशत निर्माण करून जनजीवन विस्कळीत करणा-या उपनगर येथील
विकी विकास शिराळ आणि सातपूर येथील अनिल मुकेश मगर या दोन्ही गुंडांवर गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करून जनजीवन विस्कळीत करणा-च्या उद्देशाने दहशत निर्माण केली म्हणून महाराष्ट्र पोलीस कायदयान्वये हद्दपारीची कारावाई केली. या दोघांनी उपनगर आणि सातपूर परिसरात दहशत कायम रहावी म्हणून सर्वसामान्य नागरिकांना धारदार शस्त्राने मारहाण करून गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी करून नुकसान करण्याचे इरादयाने वाहनास आग लावणे असे गंभीर गुन्हे दाखल असून,ना गरिकांच्या मनात भिती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे.
दोन्ही हद्दपार झालेल्या गुंडांनी नाशिक शहरात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करून जनजीवन विस्कळीत केल्याने त्यांचे विरुद्ध पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उप आयुक्त श्रीमती मोनिका नं. राऊत तसेच सहायक पोलिस आयुक्त आनंदा वाघ व सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांनी दोन्ही गुंड यांच्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये हद्दपारीची कारवाई केली. यापुढे देखील नाशिक शहरातील जनजीवन विस्कळीत करणा-या व समाज स्वास्थ्य बिघडवणा-या गुन्हेगार इसमांचा गुन्हयांचा अभिलेख काढण्याचे कामकाज सुरू राहणार असून त्यांचेवर महाराष्ट्र पोलीस कायदा व एमपीडीए कायदयाच्या तरतुदीनुसार प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.