झुलेलाल जयंती’ सिंधी बांधवांचा महाउत्सव…
संसार भरातील सर्वच देशांमध्ये अनेक जाती प्रजाती अस्तित्वात आहेत, त्यांच्या आपल्या भाषा व उपभाषा आहेत. संस्कृती विशेष आहे. सर्वांचीच आपली मातृभाषा असते. त्याचप्रमाणे सिंधी समाजाची मातृभाषा सिंधी आहे. त्याप्रमाणे प्रत्येक समाजाप्रमाणे सिंधी समाजाची आपली भाषा व एक संस्कृती आहे.
प्राचीन काळापासून सिंधी समाज चेटीचंडच्या पावन पर्वावर पुज्य झुलेलाल जयंती उत्साहात साजरी करत आला आहे. सिंधी समाज हा अगदी शांत आणि संयमी असा समाज आहे. सिंधी समाजाचे इतिहास प्राचीन असे इतिहास आहे. सिंधी समाज भारतीयच आहे, काही लोकांची आजही मानसिकता हीच आहे की सिंधी समाज बाहेरून आलेला आहे. भारताची फाळणी झाली त्यावेळेस आपले घरेदारे, पैसा सर्वकाही सोडून आले. सिंधी समाजावर अनेक प्रकारे अत्याचार झाले. खिशात दमडी नसतांना आपल्या मेहनतीने आपल्या समाजाचे एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.
विभाजनानंतर भारतात आल्यानंतरही चेटीचंड हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आजतागायत सुरू आहे. मागील काही दशकांपासून चेटीचंड उत्सव सिंधीयत जो डिंहुँ’ सिंधी दिवस च्या रूपाने साजरा केला जातो. याची अनेक कारणे आहेत, कारण प्राचीन संस्कृती मधून एक अशी सिंधी संस्कृती असून सिंधी समाजाचा मोठा हिस्सा आपल्या संस्कृतीपासून दुर होत चालला आहे. या सर्वांना परत आपल्या संस्कृतीत जोडण्यासाठीच चेटीचंड हा सिंधी दिवस म्हणून साजरा केला जातो. देश विदेशात सिंधी भाषा व संस्कृतीसाठी सिंधी सम्मेलन व सिंधी सेमिनारांचे आयोजन केले जाते. या सेमीनारमध्ये सिंधी भाषा व संस्कृती बद्दल भाषा व संस्कृतीच्या विकासासाठी अनेक प्रस्ताव करण्यात येतात. आपल्या संस्कृती व भाषेच्या रक्षणासाठी आपले वयोवृध्द आपले सर्व काही सोडून भारतात आले आणि इथे आपले अस्तित्व निर्माण केले.
समाजातील जागरूक वरिष्ठांनी सर्वांना प्रेमपूर्वक आपल्या समाजात मानसन्मान कायम ठेवण्यास त्यांच्या विचारांची देवाणघेवाण कसे करावे हे शिकविले. सिंधी बांधवांच्या विचारांमध्ये अद्भुत शक्ती असते. सिंधी हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर व्यापार व्यवसाय करणाऱ्या सिंधी समाजाच्या प्रेमळ चेहऱ्यांची आपल्या सर्वांच्या मनात एक वेगळीच प्रतिमा तयार होते. अत्यंत प्रेमळ व मनमिळावू, उद्यमशील सिंधी बांधवांनी देशभर मानवतेचा नंदादीप अखंड तेवत ठेवत अनेक घटनांमध्ये निर्णायक भूमिका बजावली आहे ते कोणीही विसरू शकणार नाही. व्यापार उद्योगाला समर्पित होऊन भारत पाक फाळणी झाल्यानंतर बहुसंख्य सिंधी – बांधव भारतात आले व सर्वकाही गमवून बसलेल्या या समाजातील सर्वच बांधवांनी उद्योगाच्या घरी रिध्दी सिध्दी पाणी भरी’ या म्हणीची गाठ घरून आपल्या मेहनत व जिद्दीने समाजात एक आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे पण आजही काही कमी बुध्दीचे लोक सिंधी बाहेरून आले आहे असा दुस्प्राचार समाजात करीत आहेत ही स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर होत आहे ही शोकांतिका आहे.
