देवळाली कॅम्प चेटीचंड झुलेलाल जयंती अध्यक्षपदी विजय कुकरेजा……
देवळाली कॅम्प झुलेलाल जयंती अध्यक्षपदी विजय कुकरेजा यांची निवड करण्यात आली आहे. येत्या 20 मार्च 2026 रोजी साजरी होणाऱ्या चेटीचंड महाउत्सव भगवान झुलेलाल जयंती निमित्त देवळाली कॅम्प येथील सिंधु सेवा मंडळाच्या वतिने घेण्यात आली होती.
गेल्या 20 वर्षापासून संस्थापक अध्यक्ष भगवान टिकमदास कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात झुलेलाल जयंती साजरी केली जाते. यावर्षी जयंती साजरी होणार असून जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या नियोजन बैठकीत जयंती अध्यक्षपदी विजय कुकरेजा तर जयंती उपाध्यक्ष दिपक पमननी, कार्याध्यक्ष राहुल भठीजा, खजिनदार भरत बलवानी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी संस्थापक अध्यक्ष भगवान कटारिया,आनंद नागदेव, जगदीश डेहलाणि, राजेश लुल्ला, मनीष कटारिया आदी पदाधिकारी उपस्थित होते.
