Home क्राईम ज्यादा परताव्याचे आमिष…. नरेश कारडा यांच्याविरुद्ध नाशिकरोडला गुन्हा दाखल…..

ज्यादा परताव्याचे आमिष…. नरेश कारडा यांच्याविरुद्ध नाशिकरोडला गुन्हा दाखल…..

0

ज्यादा परताव्याचे आमिष…. नरेश कारडा यांच्याविरुद्ध नाशिकरोडला गुन्हा दाखल…..


‎ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी कारडा कॉन्स्ट्रेशनचे संचालक नरेश कारडा यांच्याविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

संशयित कारडा कन्स्ट्रक्शन्सचे संचालक नरेश कारडा यांनी फिर्यादी दिनेश सुंदर दातवाणी रा. गोविंदा हाईट्स, आनंदनगर, उपनगर, हल्ली राहणार जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका यांना कारडा कन्स्ट्रक्शन्स या कंपनीच्या कन्स्ट्रक्शन्सच्या कामाकरिता गुंतवणुकीच्या रकमेवर वार्षिक 21 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून 2 ते 8 जून 2020 या कालावधीत फिर्यादीकडून 30 लाख रुपये गुंतवणूक म्हणून स्वीकारले.

22 एप्रिल 2022 रोजी फिर्यादीस गुंतवणूक व परतावा न देता त्याऐवजी मोबदला म्हणून दातवाणी यांना नाशिकरोड येथील अनुराधा थिएटरच्या जागेवर प्रस्तावित बांधकाम करणार असल्याचे सांगून त्या बांधकामातील शॉप नंबर 10 (1200 चौरस मीटर) देण्याचे पुन्हा एकदा आमिष दाखविले. त्याबाबत शंभर रुपयांच्या बॉण्ड पेपरवर एमओयू सुद्धा तयार करून दिला होता.

परंतु त्यानंतरही ठरल्याप्रमाणे गुंतवणूक व परताव्याची रक्कम किंवा अनुराधा थिएटर येथील जागेवर प्रस्तावित बांधकामातील शॉप हे फिर्यादीला अद्यापपर्यंत न दिल्याने अखेर दातवाणी यांनी फसवणूक झाल्याने या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने नरेश कारडा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा अधिक तपास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस उप निरीक्षक अहिरे करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version