समुपदेशन सुरू असताना पतीवर हल्ला….
नाशिक शहरातील महिला सुरक्षा कक्षात समुपदेशन सुरू असताना मुलीच्या मनाने थेट महिला पोलिसांच्या उपस्थितीत हल्ला केल्याने पोलिस कक्षात नागरिक सुरुक्षित नाही का असा सवाल उपस्थित होत आहे.
पोलिस कक्षात भरोसा सेल मध्येच हल्ला झाल्याने रक्ताचा सडा पसरला होता. शहरातली गुन्हेगारी थेट पोलिसांच्या दारातच पोहोचली असून पोलिसांचे भय कुणावर राहिले नसल्याचे यातून दिसून येते.
घटस्फोट घेण्याचा वाद असलेल्या पतीपत्नीचे नाशिक पोलिसांच्या भरोसा कक्षात समुपदेशन झाल्यावर कक्षबाहेर उभे असताना मुलीच्या मामाने थेट महिला पोलिसांच्या उपस्थतीत चाकूने पतीवर हल्ला केला.
पौर्णिमा संतोष अहिरे यांचे आणि पती संतोष पंडित अहिरे या दोघांमध्ये मध्यस्थी करण्याकरिता त्यांना समुपदेशन कक्षात बोलवण्यात आले होते. समुपदेशन सुरू असताना मुलीचे मामा नानासाहेब नारायण ठाकरे यांना कसला तरी राग आला आणि त्यांनी पोलिस कक्षात संतोष यांच्यावर हल्ला केला.
भरोसा कक्षाच्या शेजारी सहायक पोलिस आयुक्त यांचे कार्यालय आहे, हल्ला झाल्यानंतर भरोसा कक्षातील आरडाओरड ऐकून सहायक पोलीस आयुक्त यांचे सुरक्षा रक्षक प्रकाश खैरनार या पोलीस कर्मचाऱ्याने हल्लेखोराला पकडले.
हल्ल्यात संतोषभा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या मामाचे नाव नानासाहेब नारायण ठाकरे असून भरोसा सेल मध्येच रक्ताचा सडा पडलाय, पत्नी पौर्णिमा संतोष अहिरे, तिचा मामा आणि सोबत असलेल्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहै.