Home ताज्या बातम्या स्वररंग इव्हेंट प्रस्तुत ‘ डिस्को बहार ‘ सांगितिक मेजवानीत आजी...

स्वररंग इव्हेंट प्रस्तुत ‘ डिस्को बहार ‘ सांगितिक मेजवानीत आजी आजोबा दंग …..

0

स्वररंग इव्हेंट प्रस्तुत ‘ डिस्को बहार ‘ सांगितिक मेजवानीत आजी आजोबा दंग …..

नाशिकरोड : ” प्यार जिंदगी है, चाहिये थोडा प्यार, आय एम अ डिस्को डान्सर, जवानी जानेमन, आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे, वो केहते है हमसे, रात बाकी बात बाकी, दगा दगा वै वै,, नैनो मे सपना, मौसम है गाने का, झूठ बोले कौआ काटे, बदन पे सितारे, आपके आ जाने से, ओम शांती ओम,” अशी एक से गाणी कलाकारांनी सादर करीत आबाल वृद्धांना मंत्रमुग्ध केले .

निमित्त होते हिरावाडी रोडवरील वात्सल्य आनंदाश्रम येथे स्वररंग इव्हेंट प्रस्तुत शैलेश सोनार आयोजित ‘ डिस्को बहार ‘ कार्यक्रमात सुमधुर मराठी, हिंदी गीतांची सांगितिक मैफिल मान्यवरांच्या व आजी आजोबांच्या उपस्थितीत उत्साहात रंगली . यात स्वतः शैलेश सोनार यासह गायक जितेंद्र दिवे , संजय परमसागर, सदाशिव इंगळे, रुपेश शिंपी, अँथोनी सरदार, अमोल मोरे, स्नेहा केदारे, सुवर्णा भुसे, वैशाली राजपूत, अस्मिता कुलकर्णी, दीपक सूर्यवंशी, सचिन पवार, प्रकाश महाले या गायकांनी एक से एक विविध गीते सादर केली. या गाण्यांचा आनंद घेत वृद्ध आजी आजोबा यांनी उस्फुर्त दाद देत काही गाण्यांवर नाचत ठेका धरला.


सर्व कलाकारांचे वात्सल्य वृद्धाश्रमाचे संचालक व संस्थापक अध्यक्ष सतीश सोनार व सौ. पायल सोनार यांनी स्वागत केले. स्वर रंग इव्हेंट वतीने दर महिन्याला वृद्धाश्रमास भेट देऊन विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. कार्यक्रमास किशोर वडनेरे व मोहन निकम यांची विशेष उपस्थिती लाभली. सौ. रोहिणी सोनार यांनी खुमासदार काव्यशैलीत सूत्रसंचालन करून वृद्ध आजी-आजोबांची वाहवा मिळवत खीळवून ठेवले . श्री. सुरेश काफरे यांनी सुरेल ध्वनीसंयोजन केले. सर्वांनी एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत समारोप केला.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version