Home क्राईम घरफोडीचा आरोपी जेरबंद….. नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची कामगिरी…..

घरफोडीचा आरोपी जेरबंद….. नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची कामगिरी…..

0

 

घरफोडीचा आरोपी जेरबंद….. नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची कामगिरी…..

नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडीचा पर्दाफाश करून घरफोडी करणा-या एका आरोपीतास ताब्यात घेवुन एक मोबाईल हस्तगत केला आहे. नाशिकरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरी करणारे आरोपींवर लक्ष ठेवुन त्यांचा शोध घेत असताना २३ डिसेंबर रोजी गुन्हे शोध पथकाचे अजय देशमुख यांना मोबाईल घेवुन एक जण हा विक्री करण्यासाठी वालदेवी नदी येथील पाटील नर्सरी कडे जाणा-या ब्रिज खाली येत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने नाशिकरोड पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथकातील सहायक पोलिस निरीक्षक प्रविण सुर्यवंशी, विजय टेमगर, नितीन भामरे, बाना पानसरे, समाधान वाने, विशाल कुंवर, अजय देशमुख, आदींनी पाटील नर्सरी कडे जाणा-या वालदेवी नदी वरील ब्रिज येथे एक जण संशयीत हालचाली करित असताना दिसुन आला.

पोलीसांना बघुन पळु जात असता गुन्हे शोध पथकाने त्याचा पाठलाग करून पकडुन संशयित रोहीत दाविद गायकवाड वय २७ वर्षे रा. रमाबाई आंबेडकर नगर, मालधक्कारोड, नाशिकरोड याला ताब्यात घेऊन 40 हजार रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे. सदर आरोपी याच्या कडुन घरफोडीचा गुन्हा उघडकीस आलेला असुन दाखल गुन्हयाचा तपास विजय टेमगर हे करीत आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त किशोर काळे , सहायक पोलीस आयुक्त संगिता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, तसेच सहायक पोलीस निरीक्षक प्रविण सुर्यवंशी, विजय टेमगर, विशाल कुंवर, नाना पानसरे, अजय देशमुख, समाधान वाजे,
नितीन भामरे आदींनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version