सोनसाखळी चोरांचा उच्छाद….. उपनगर पोलिसांना आव्हान…..
उपनगर पोलिस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोरांनी उच्छाद मांडून पोलिसांना आव्हान दिले असून एकाच दिवशी दोन चेन स्नाचिंग च्या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी सकाळी टाकली रोड वरील इंद्रायणी सोसायटी येथे महिलेच्या गळ्यातील दोन तोळे असलेली चेन ओरबाडून नेली. दुसरी घटना उपनगर येथील महारुद्र कॉलनी आस्मी बंगला जवळ महिलेच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र सोनसाखळी चोरांनी चोरून नेले. एकाच दिवशी झालेल्या दोन सोनसाखळी घटनांनी परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
एकीकडे जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला रुजत असताना सोनसाखळी चोरांनी पोलिसांना आव्हानच दिले आहे.
घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
