Home ताज्या बातम्या स्वररंग इव्हेंट प्रस्तुत ‘ आशा ही आशा’ सांगितिक मेजवानीत आजी...

स्वररंग इव्हेंट प्रस्तुत ‘ आशा ही आशा’ सांगितिक मेजवानीत आजी आजोबा दंग …..

0

स्वररंग इव्हेंट प्रस्तुत ‘ आशा ही आशा’ सांगितिक मेजवानीत आजी आजोबा दंग …..

नाशिकरोड : ” जाईये आप कहा जायेंगे, लेकर हम दिवाना दिल, गुन गुना रहे है भवर, जांभुळ पिकल्या झाडाखाली, केहे दु तुम्हे या चुप रहु, ढल गया दिन, रेशमाच्या रेघांनी, पिया बावरी, जाने जा ढूंढता फिर रहा, दिल्लगीने दी हवा, ओ हसीना जुल्फो वाली, प्यार मे दिल पे मार दे गोली, जवानी जानेमन, गोरी तेरे अंग अंग में,” अशी एक से गाणी कलाकारांनी सादर करीत आबाल वृद्धांना मंत्रमुग्ध केले .


निमित्त होते हिरावाडी रोडवरील वात्सल्य आनंदाश्रम येथे स्वररंग इव्हेंट श्री शैलेश सोनार प्रस्तुत ‘ हम ७ साथ है ‘ मध्ये गायिका आशा भोसले यांच्या गीतावर आधारित ” आशा ही आशा ” कार्यक्रमात सुमधुर मराठी, हिंदी गीतांची व नृत्याची सांकेतिक मैफिल मान्यवरांच्या व आजी आजोबांच्या उपस्थितीत उत्साहात सम्पन्न झाला . यात स्वतः शैलेश सोनार यासह गायक जितेंद्र दिवे , अमोल मोरे , मयुरी मुरडेश्वर, वनिता आहेर, स्नेहा केदारे, सुवर्णा भुसे या गायकांनी एक से एक विविध गीते सादर केली. या गाण्यांचा आनंद घेत वृद्ध आजी आजोबा यांनी उस्फुर्त दाद दिली . कु. तपस्या भुसे व गौरांगी कुलकर्णी यांनी उत्कृष्ट नृत्य सादर करत जोरदार टाळ्या मिळवल्या. सर्व कलाकारांचे वात्सल्य वृद्धाश्रमाचे संचालक व संस्थापक अध्यक्ष सतीश सोनार व सौ. पायल सोनार यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. स्वर रंग इव्हेंट वतीने दर महिन्याला वृद्धाश्रमास भेट देऊन विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. कार्यक्रमास यु एस ए येथील साई शारदादेवी कुचीभोटला परिवार यांचे सहकार्य लाभले. सौ. रोहिणी सोनार व कु. राजनंदिनी सोनार यांनी खुमासदार काव्यशैलीत सूत्रसंचालन करून वृद्ध आजी-आजोबांची वाहवा मिळवत खीळवून ठेवले . श्री. सुरेश काफरे यांनी सुरेल ध्वनीसंयोजन केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version