Home क्राईम कैद्याने कारागृह पोलिसाच्या श्रीमुखात भडकवली…..

कैद्याने कारागृह पोलिसाच्या श्रीमुखात भडकवली…..

0

कैद्याने कारागृह पोलिसाच्या श्रीमुखात भडकवली…..

नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने कारागृह पोलीस कर्मचाऱ्यांच्या श्रीमुखात भडकावली असल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी घडला असून या प्रकारानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने नाशिक रोड पोलीस ठाण्यात कैद्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.मध्यवर्ती कारागृहात रुपेश आनंदा पवार हे पोलीस कर्मचारी असून दोन दिवसापूर्वी ड्युटीवर असताना साडेतीन वाजेच्या दरम्यान कारागृहातील सर्कल क्रमांक आठ मधील कैदी अमर मारुती माळी हा कोणाची परवानगी न घेता क्रमांक सहा मधील सर्कलमध्ये त्याचा कैदी मित्र राहुल सुनील खंडारे यास भेटण्यासाठी आला व बोलू लागला यावेळी ड्युटीवर असलेले रुपेश पवार यांनी माळी यास विचारणा केली की तू या सर्कलमध्ये कसा काय आला परवानगी घेतली का असे विचारले असता पवार यांच्या बोलण्याचा माळी यास राग आला त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे ते करा मी जाणार नाही असे बोलून कैदी अमर माळी याने पोलीस कर्मचारी आनंद पवार यांच्या श्रीमुखात चापट मारली.

दरम्यान या घटनेनंतर कारागृहातील इतर कैदी आले व त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला सदर घटने प्रकरणी कारागृह पोलीस कर्मचारी रुपेश पवार यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version