Home क्राईम बेथेलनगर गोळीबारातील मुख्य आरोपी जेरबंद….. १० किमी पर्यंत सिनेस्टाईल पाठलाग….. गुन्हेशाखा युनिट...

बेथेलनगर गोळीबारातील मुख्य आरोपी जेरबंद….. १० किमी पर्यंत सिनेस्टाईल पाठलाग….. गुन्हेशाखा युनिट क. १ ची कारवाई

0

बेथेलनगर गोळीबारातील मुख्य आरोपी जेरबंद….. १० किमी पर्यंत सिनेस्टाईल पाठलाग….. गुन्हेशाखा युनिट क. १ ची कारवाई…

बेथेलनगर नाशिक येथील गोळीबारातील मुख्य आरोपी राहूल पवार याला गुन्हे शाखा युनिट १ ने
नांदगावं येथून जेरबंद केले आहे.

०३ नोव्हेंबर रोजी रात्री बेथेलनगर, शरणपुर नाशिक येथे राहुल पवार व त्याचे इतर ५ ते ६ साथीदारांनी हातातील कोयते, चॉपर, दांडके अशा हत्यारांनी गल्लीत उभ्या असलेल्या रिक्षा, मोटार सायकल यांच्या काचा फोडून काचेच्या बाटल्या घरावर फकून गल्लीतील लोकांना शिवीगाळ करून, धमकावून गल्लीत दहशत माजवून गोळीबार केला होता.

 

त्यातील एकाने फिर्यादी यांना तुझा गेमच वाजवतो असे धमकावून खून करण्याच्या हेतूने फिर्यादी यांच्यावर कोयता उगारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. सरकारवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आला होता. गुन्हयातील मुख्य संशयीत राहुल पवार इतर फरार आरोपींचा शोध घेत असताना राहूल पालखेडे व महेश साळुंके, आप्पा पानवळ व नितीन जगताप यांना गुन्हयातील आरोपी राहुल मंच्छिंद्र पवार हा नांदगावं परिसरात फिरत असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली होती.

तत्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथक नांदगावं येथे तपासकामी रवाना झाले सदर पथकाने सतत दोन दिवस व दोन रात्र नांदगावं परीसरातील शेतमळे व इतर लोकवस्तीचे ठिकाणी वेशांतर करून फिरत होते. राहुल पवार हा नांदगाव येथून दुसऱ्या जिल्हयात पसार होत असले बाबत पथकाला चाहूल लागल्याने पथकाने गावकऱ्यांच्या वेशात सापळा लावला. आरोपीस पोलीसांची चाहूल लागल्याने तो मोटार सायकलवर पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना पथकाने १० किलोमिटर पर्यंत पाठलाग करून संशयित राहुल यास ताब्यात घेतले.

सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ च्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंचल मुदगल, पोलीस उप निरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उप निरीक्षक सुदाम सांगळे, पोलिस उप निरीक्षक किरण शिरसाठ, महेश साळुंके, उत्तम पवार, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, नितीन जगताप, गोरक्ष साबळे, राम बर्डे, उत्तम खरपडे, मपोअं अनूजा येलवे, समाधान पवार यांनी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version