नाशिकरोडला कारवाईत साहित्य जप्त….
मनपा उपायुक्तांची अतिक्रमण विभागाला भेट…..
नाशिक मनपा उपयुक्त नांदुरकर मॅडम यांची नाशिकरोड अतिक्रमण विभागाला भेट दिली. आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहिम सुरू करण्यात आली आहे. नाशिकरोड विभागात जोरदार मोहीम सुरू सूज उपायुक्तांनी अतिक्रमण गोडाऊन येथे अचानक भेट देऊन माहिती घेत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
०५ नोव्हेंबर रोजी आयुक्त खत्री मॅडम, उपआयुक्त अतिक्रमण नांदुरकर मॅडम यांच्या आदेशान्वये विभागीय अधिकारी डॉ. प्रज्ञा त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड विभागातील गोसावी वाडी, मिना बाजार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अण्णा हजारे मार्ग, टिळकपथ, बिटको पॉईंट, मुक्तीधाम परिसर, गायकवाड मळा, रेजिमेंटल प्लाझा, नाशिकरोड रेल्वेस्टेशन येथे अतिक्रमण कर्मचारी अमित पवार, ठेकदारांचे कर्मचारी, NBS कर्मचारी यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली
सदर कारवाईमध्ये रस्त्यावर लागणारे स्टँड बोर्ड, टेबल, खुर्ची, बाकडे जप्त करण्यात आले
