मातंग समाजाच्या तरुणावर हल्ला…. गुन्हा दाखल करण्याची मागणी…..
धरणे आंदोलनाचा इशारा…..
मातंग समाजाच्या तरुणावर
सोनई, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथे संजय वैरागर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्याची सखोल चौकशी होवून वैरागर याला ठार मारण्याचे जाहीर आवाहन करणाऱ्या समाज गुंडांवर गुन्हे दाखल करावेत म्हणून नाशिक मातंग समाज समन्वय समिती तर्फे महसूल आयुक्त कार्यालयात महसूल आयुक्तांना निवेदन देण्यात आले. तरुण वैरागर या मुलावर सेनाई गावातील 10 ते 15 गावगुंडानी हल्ला करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सदरचा हल्ला हा ठरवुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने करण्यात आला. सदरचा प्रकार जाती व्देषाने करण्यात आला. सदर तरुणाला आम्ही मारले नाही. आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असे म्हणणाऱ्यांनी आता हात पाय तोडले जर पुन्हा नादी लागला तर जिवे ठार मारु असे जाहीर केले.
संजय वैरागर याला भविष्यात ठार मारण्याचा प्रयत्न असून संबंधितांवर प्रतीबंधक कारवाई करण्यात येवुन सदरील गुन्हयातील आरोपींना जामिन न देता तुरुगात ठेवूनच निकाल लागे पर्यंत खटला चालविण्यात यावा. संबंधितांना जामीन दिला तर संजय वैरागर याला संबंधित जिवे ठार मारु शकतात. कारण आरोपींचे नातेवाईक दवाखान्यात संजय वैरागच्या आई व वडीलांना आरोपीतांना सहकार्य करण्याबाबत सातत्याने धमकावत आहे.
तरी सदर कुटूंबाला पोलीस संरक्षण दयावे जिवेठार मारण्याची जाहीरपणे भाषा वापरण्याऱ्यांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. कारवाई न झाल्यास 7 नोव्हेंबर रोजी महसुल आयुक्त कार्यालय नाशिकरोड यांच्या कार्यालया समोर दुपारी 12.00 वाजता ते 4.30 वाजे पर्यंत धरणे आंदोलन करुन या सरकारचे या प्रकरणाकडे लक्ष वेधले जाईल असे इशारा देण्यात आला आहे.
यावेळी आकाश बागुल, सूर्यकांत भालेराव, अनिल बाविस्कर, यौगेश नवगिरे, चंदन राजगिरे, नानासाहेब खंडाळे, सतीश तायडे आदी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
