सिंधी समाजाचा मूक मोर्चा…..
सिंधी समाजाचा अपमान सहन करणार नाही…..
सिंधी बांधवा आणि कुलदैवत भगवान झुलेलाल यांच्याबद्दल अपमानजनक भाषा वापणाऱ्या छत्तीसगड येथील क्रांती सेना अध्यक्ष अमित बघेल यांच्याविरोधात सिंधी समाजात जन आक्रोश पसरला असून बघेल यांच्या विरोधात मंगळवार 4 नोव्हेंबर मूक मोर्चा काढण्यात आला.देवळाली कॅम्प येथील पूज्य सिंधी पंचायतीचे अध्यक्ष रतन चावला यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
रायपूर छत्तीसगड येथील एका स्थानिक राजकीय पक्षाचे नेते अमित बघेल यांनी पूज्य इष्टदेव साई झुलेलाल महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने समस्त सिंधी समाजाच्या भावना दुखविल्या गेल्या आहेत. त्यांच्या वक्तव्याचा समस्त सिंधी समाजातर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
देवळाली कॅम्प येथील सिंधी समाजाने सकाळी ११.३० वाजता भगवान झुलेलाल यांचे दर्शन घेऊन झेंडा चौक येथून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यापर्यंत मुक मोर्चा काढला. हा मोर्चा छत्तीसगडमधील राजकीय नेते अमित बघेल यांनी सिंधी समाज व आराध्य देव साई झूलेलाल भगवान यांच्या विषयी केलेल्या अपमानास्पद व अशोभनीय वक्तव्याच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आला होता. सिंधी समाजाने काढलेला हा मोर्चा शांततामय व अनुशासित पद्धतीने काढण्यात आला होता.
मूक मोर्चा नंतर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांना निवेदन देऊन समस्त सिंधी समाजाने अमित बघेल यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.
संत महात्म्यांची बदनामी कोणीही करू नये तसेच जाती मध्ये द्वेष निर्माण होईल अशी भाषा करू नये. बघेल यांनी झुलेलाल महाराजांची केलेली बदनामी निषेधार्ह असल्याने त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी पूज्य सिंधी पंचायत समितीचे अध्यक्ष रतन चावला यांनी केली.
यावेळी निषेध मोर्चात क्रिश आहुजा, सोनू वेनसियानी, नितीन कारडा, सुनील फतनानी, सोनू रामवानी, जयेश मखिजा, आकाश धमेजा, कमल धमेजा, हर्षु डोळतानी, तरुण पंजाबी, सन्नी चावला सह सिंधी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.
