गुरुनानक जयंती निमित्त प्रभात फेरीला सुरुवात….
श्री गुरुनानक देवजी जयंती निमित्त प्रभात फेरीला मंगळवार 28 ऑक्टोबर पासून भक्तिभावाने सुरुवात झाली. गुरुनानक देवजी यांची जयंती येत्या 5 नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे.
त्यानिमित्ताने नाशिकरोड येथील गुरुद्वारात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असतात. मंगळवार पासून प्रभातफेरी मंगलवार 28 ऑक्टोबर ते मंगळवार 4 नोव्हेंबर पर्यंत आयोजित करण्यात आली असून दररोज सकाळी 5.15 वाजता गुरुद्वारा साहेब नाशिकरोड येथून प्रारंभ होणार आहे.
प्रभातफेरीचा मार्ग याप्रमाणे असणार आहे. मंगलवार 28 ऑक्टोबर : बिटको-मुक्तीधाम-हरि निवास-गुरुद्वारा साहेब,
बुधवार 29 ऑक्टोबर : म्हसोबा मंदिर – मनोहर गार्डन – गुरुद्वारा साहेब
गुरुवार 30 ऑक्टोबर : हरी नक्षत्र – सिंधी कॉलनी – गुरुद्वारा साहेब
शुक्रवार 31 ऑक्टोबर : जयभवानी रोड – गुरुद्वारा साहेब
शनिवार 01 नोव्हेंबर : तरण तलाव – आनंद नगर – गुरुद्वारा साहेब
रविवार 02 नोव्हेंबर : सुयोजित-गंधर्व नगरी-शिखरेवाडी-गुरुद्वारा साहेब
सोमवार 03 नोव्हेंबर : पंजाब कॉलनी – जगताप मला – गुरुद्वारा साहेब
मंगलवार 04 नोव्हेंबर : उपनगर – आयोध्यानगर – गुरुद्वारा साहेब अशा प्रकारे मार्ग असणार आहे भाविकांनी याची नोंद घ्यावी. भाविकांनी मोठ्या संख्येने प्रभातफेरीत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
