खुनातील आरोपी नाशिकरोडला ताब्यात…. गुन्हे शाखा युनिट १ ची कामगिरी…..
जालना जिल्ह्यातील कदीम पोलीस ठाणे जिल्हा जालना येथील खुनाच्या गुन्हयातील मुख्य आरोपीस नाशिक शहरात गुन्हेशाखा युनिट क. १ ने अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
विकास प्रकाश लोंढे, वय-२४वर्षे, रा-लहुजी चौक, नुतन वसाहत, जालना यास जुन्या भांडणाची कुरापत काढून रस्त्यात अडवुन जातीवादक शिवीगाळ करून रॉड, लाकडी दांडा व लाथाबुक्यांनी मारहाण करून जिवे ठार मारले होते.
सदर गुन्हयातील फरार आरोपीचा शोध घेत असताना गुन्हेशाखा युनिट १ चे प्रशांत गरकड यांना सदरचा गुन्हा हा विशाल गायकवाड याने केला असुन तो नाशिकरोड, रेल्वेस्टेशन परिसरात आल्याची खात्रीशीर माहीती मिळाल्याने तत्काळ पथकाने नाशिकरोड, रेल्वे स्टेशन तसेच बसस्थानक परिसरात शोध घेऊन २५ रोजी नाशिकरोड बसस्थानक येथून संशयित विशाल उर्फ वांग्या शिवाजी गायकवाड, वय-२४ वर्षे, रा- लहुजी चौक, नुतन वसाहत, जालना यास शिताफीने पकडुन ताब्यात घेतले . गुन्हया बाबत अधिक तपासात विचारपुस त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदारांसह केल्याची कबुली दिली. आरोपीस पुढील कारवाई साठी स्थानिक गुन्हेशाखा, जालना यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त संदिप मिटक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, पोलिस उप निरीक्षक सुदाम सांगळे, प्रशांत मरकड, प्रदिप म्हसदे, देविदास ठाकरे, विशाल काठे, सुकाम पवार, जगेश्वर बोरसे, अनुजा येलवे तसेच तांत्रिक विष्लेशनाचे सहायक पोलीस निरीक्षक जया तारडे, विशाल साबळे यांनी केली आहे.
