Home ताज्या बातम्या बिटको महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाचे बॅडमिंटन स्पर्धेत सुयश..५ मुलींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड…

बिटको महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाचे बॅडमिंटन स्पर्धेत सुयश..५ मुलींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड…

0

बिटको महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाचे बॅडमिंटन स्पर्धेत सुयश..५ मुलींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड…

नाशिकरोड : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी १९ वर्ष आतील गटामध्ये दि.१७ ऑक्टोंबर २०२५ रोजी मीनाताई ठाकरे विभागीय स्टेडियम नाशिक येथे झालेल्या शालेय विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. उत्तुंग कामगिरी करत जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव नाशिक पाच जिल्ह्यातील स्पर्धकांना नमवून राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झाली. दि. ३ ते ५ नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर येथे होणाऱ्या राज्यस्तर स्पर्धेसाठी नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. यात संतोषी खैरनार, साक्षी पगारे, यशस्वी बाहरी, विजया आहिरे, सांची बागुल यांचा समावेश आहे. आपल्या कष्ट, एकाग्रता व आत्म विश्वासा मुळे ही यशाची पायरी त्यांना गाठता आली आहे.


त्यांच्या या सुयशाबद्दल गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.आर. पी. देशपांडे , सचिव डॉ. सौ.दिप्ती देशपांडे, चेअरमन डॉ. सौ. सुहासिनी संत, नाशिक विभागाचे विभागीय सचिव डॉ.राम कुलकर्णी , प्रकल्प संचालक प्रा .पी. एम. देशपांडे , आस्थापना संचालक श्री.शैलेश गोसावी , संचालक( क्यू. आणि एस. ) श्री.अक्षय देशपांडे , नाशिक विभागाचे सहाय्यक विभागीय सचिव डॉ.व्ही.एन.सूर्यवंशी , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे , उपप्राचार्या प्रणाली पाथरे डॉ. आकाश ठाकूर सर, डॉ. अनिल कुमार पठारे सर, डॉ. सतीश चव्हाण , पर्यवेक्षिका आर. एस.पाटील, क्रीडा शिक्षक योगेश शिंदे, वरीष्ठ महाविद्यालय शारीरिक शिक्षण संचालक प्रा. धनंजय बर्वे , जिमखाना सहाय्यक श्री. विठ्ठल कोठुळे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच तालुका क्रीडा अधिकारी खांडेकर सर तसेच एच पी टी महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक कोकाटे सर, प्रशिक्षक व पंच या सर्वांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version