Home ताज्या बातम्या महाराष्ट्र शासनाच्या नाशिक विभागीय समितीवर अर्थतज्ञ डॉ. कृष्णा शहाणे यांची नियुक्ती….

महाराष्ट्र शासनाच्या नाशिक विभागीय समितीवर अर्थतज्ञ डॉ. कृष्णा शहाणे यांची नियुक्ती….

0

 

महाराष्ट्र शासनाच्या नाशिक विभागीय समितीवर अर्थतज्ञ डॉ. कृष्णा शहाणे यांची नियुक्ती….

 

महाराष्ट्र शासनाच्या नाशिक विभागीय ग्राहक किंमत निर्देशांक समितीवर बिटको महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. कृष्णा शंकर शहाणे यांची तज्ञ सदस्य म्हणून नुकतीच निवड करण्यात आली आहे.

नियोजन विभाग अर्थ व सांख्यिकीय संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या कार्य कक्षेत येणाऱ्या नाशिक विभागीय पातळीवरील ग्राहक किंमत निर्देशांक निर्धारित करणे या प्रमुख कामासह इतर अनेक कामे या समितीची असतील. समितीची कार्यकक्षा ही नाशिक विभाग म्हणजेच नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी असून सदर निवड ही आगामी पाच वर्षांसाठी असेल.डॉ. कृष्णा शहाणे हे बिटको महाविद्यालय नाशिकरोड येथे अर्थशास्त्र विभाग प्रमुख व प्रभारी प्राचार्य या पदावर कार्यरत असून आर्थिक घडामोडींचे जाणकार आहेत.

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई यांनी त्यांची १५ आणि इतर प्रकाशना मार्फत ५ अशी अर्थशास्त्रावरील एकूण २० क्रमिक पुस्तके प्रकाशित केलेली असून. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातून अर्थशास्त्र विषयावरील विविध संशोधन पेपर त्यांनी सादर केलेले आहेत. मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स मुलुंड मुंबई खालसा कॉलेज मुंबई केळकर कॉलेज मुंबई यांच्या अभ्यास मंडळावर ते सदस्य आहेत.

अर्थशास्त्र या विषयावर आकाशवाणी केंद्र नाशिक येथून त्यांची अनेक प्रख्याने प्रसारित झालेली आहेत. याशिवाय ते कांदा प्रश्नाचे जाणकार असून या विषयावर ते पीएचडी प्राप्त आहेत.याबद्दल गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, आस्थापना संचालक शैलेश गोसावी, श्री कल्पेश गोसावी, अध्यक्ष डॉ.आर. पी. देशपांडे, कार्याध्यक्ष डॉ. सुहासिनी संत, नाशिक विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, सहाय्यक विभागीय सचिव प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, सहाय्यक ब्रांच सेक्रेटरी डॉ. प्रणव रत्नपारखी, कुलसचिव गिरीश नातू आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version