Home क्राईम तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड…… पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक…..

तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड…… पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक…..

0

तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड…… पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक…..

नाशिक रोड परिसरातील विहित गाव आणि धोंगडे मळा परिसरात दहशत माजविनाऱ्या गुंडांची उपनगर पोलिसांनी धिंड काढली. परवा विहित गाव आणि काल रात्री धोंगडे मळा येथे तोडफोड करून या गुंडांनी दहशत निर्माण केली होती. नागरिकांमध्ये याबाबत प्रचंड संताप पाहायला मिळाला. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्न करीत होते परंतु पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याप्रकरणाची गंभीर दाखल घेतली.

उपनगर पोलिसांनी वेळीच या गुंडांना अटक केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. दोन्ही घटनांमध्ये एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. नागरिकांमध्ये असलेली भीती दूर करणे आणि गुंडांना अटक करने हे मोठे आवाहन होते पण सहायक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम कामगिरी केल्याने सर्वांचे कौतुक होत आहे.


आज सायंकाळी उपनगर पोलिसांनी हैदोस घालणाऱ्या गुंडांची वीहितगाव आणि धोंगडे मळा परिसरात धिंड काढली. नागरिकांनी घाबरून न जाता यासारख्या तोडफोड जाळपोळ करणाऱ्या गुंड प्रवृत्ती कुठेही दिसून आल्यास तात्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यात संपर्क करून माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. यावेळी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत हायक पोलिस आयुक्त आनंद वाघ, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे, सहायक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी आणि पोलिस कर्मचारी उपस्थित होते 

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version