Home ताज्या बातम्या छंद जोपासल्याने जगण्यातील गोडवा द्विगुणीत होतो : प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे …..

छंद जोपासल्याने जगण्यातील गोडवा द्विगुणीत होतो : प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे …..

0

छंद जोपासल्याने जगण्यातील गोडवा द्विगुणीत होतो : प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे …..

विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमाबरोबर विविध छंदांचा अंगीकार करावा छंद जोपासल्याने जगण्यातील गोडवा द्विगुणित होतो तसेच विद्याभ्यासात देखील लक्ष लागते आणि उत्तम प्रकारचे छंद जोपासल्यास आपणास आयुष्याची योग्य दिशा मिळू शकते असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांनी केले.


विघ्नेश्वर गणेश मंदिर देवस्थान जेलरोड यांचे वतीने गणेशोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बिटको महाविद्यालय नाशिक रोड येथील प्रभारी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे हे उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर विघ्नेश्वर गणेश मंदिर देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मोहन सुळे, विलास गोडसे, संदीप चव्हाण, बोरसे, तिवारी सौ गौरी वैद्य, शारदा बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच या कालावधीत अपोलो हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यांच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. चाळीसगावकर, डॉ. निरगुडे, डॉ. खरोटे, डॉ. केळकर आदी मान्यवर उपस्थित होते.


दरम्यान गणेशोत्सव कालावधीमध्ये देवस्थानच्या वतीने गायन, नृत्य, वादन, चित्रकला, रांगोळी यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन विविध गटांमध्ये करण्यात आले होते. संपूर्ण गणेशोत्सव कालावधीमध्ये दररोज या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version