जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…..अहमदाबाद हत्येचा निषेध….
नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना अहमदाबाद येथील घटनेचा निषेध व्यक्त करत नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशन तर्फे निवेदन देण्यात आले.
अहमदाबाद येथे 19 ऑगस्ट रोजी नयन सन्तानी या दहावीत शिकणाऱ्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. भविष्यात अशा घटना पुन्हा होऊ नये याविषयी केंद्रीय आणि राज्य स्तरावर चर्चा व्हावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवडण्याची प्रत प्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पाठविण्यात आल्या आहेत.
हत्या झालेल्या नयन संतानी यांच्या परिवाराला न्याय आणि भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सरचिटणीस राजेश गोडवानी, पवन खटवानी, कैलास राणी आदी उपस्थित होते.
