खलनायकाला अटक….. खुनातील फरार आरोपी हिमाचल प्रदेश मधून अटक….. गुंडा विरोधी पथकाची कारवाई…..
खुनाच्या गुन्हयात ८ वर्षापासुन फरार असलेल्या “खलनायकास” कुल्लू, राज्य हिमाचल प्रदेश येथून अटक करून गुंडा विरोधी पथकाने उल्लेखनिय कामगिरी केली आहे.
पंचवटी परिसरात निकम गैंग व उघडे गैंग यांच्यात होणाऱ्या वर्चस्ववादाच्या १८ मे २०१७ रोजी नवनाथ नगर, पंचवटी, नाशिक येथे राहणारा निकम गँगचा किरण राहुल निकम हा मोटार सायकलवर जात असतांना त्याचे विरोधी उघडे गैंगवे संतोष उघडे, संतोष पगारे यांनी त्याला रस्त्यात अडवुन मागील भांडणाची कुरापत काढली त्यावेळी गणेश उघडे, बंडु मुर्तडक व त्यांचे इतर साथीदार मागुन आले आणि किरण राहुल निकम याच्या शरीरावर धास्थार शस्त्राने वार करून ठार मारुन पळून गेले होते. गणेश उपघटे, जितेश उर्फ बंडु मुर्तडक, संतोष पगारे, सागर जाधव, संतोष उघडे, जयेश उर्फ जया दिवे, शाम पवार, विकास उर्फ विक्की पंजाबी, अनुपमकुमार उर्फ छोटू कनोजीया या आरोपीविरुध्द पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयातील आरोपी गणेश अशोक उघडे, संतोष अशोक उघडे, संतोष विजय पगारे, जितेश उर्फ बंडु संपत मुर्तडक यांना न्यायालयाने ०९ मे २०२३ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. गुन्हयातील विकास उर्फ चिक्की पंजाबी हा गुन्हा दाखल झाले पासुन फरार होता.
गंभीर स्वरुपाच्या गुन्हा आलेले इतर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा लागली परंतु गुन्हयातील मुख्य आरोपी हा फरार असल्याने त्यास तात्काळ अटक करणे गरजेचे होते. गुन्हयातील ८ वर्षापासून फरार आरोपी विकास उर्फ विक्की पंजाबी याची माहिती काढण्यास सुरुवात केली असता तो मुळचा चंदीगड राज्य पंजाब येथील रहिवासी असुन सध्या तो चंदीगड येथे असल्याची माहिती विजय सुर्यवंशी व राजेश राठोड यांना मिळाली. सन २०१७ मध्ये गुन्हे करण्यापुर्वी त्याच्या मित्रांची गोपनीयपणे माहिती काढली त्यानुसार आरोपी विकास उर्फ विक्की पंजाबी हा चंदीगड राज्य पंजाब येथे हॉटेल व्यवसाय करीत असल्याची गुंडा विरोधी पथकाने काढली. २१ ऑगस्ट रोजी गुंडा विरोधी पथक चंदीगह राज्य पंजाब येथे रवाना झाले. चंदीगड येथे आरोपी विक्की पंजाबी याला खलनायक म्हणून ओळखत असल्याची माहिती मिळाली तसेच तो ब-याच वर्षापासुन कुल्लू, हिमाचल प्रदेश येथील पुलगा गावाच्या परिसरात होटेल व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली. गुंडा विरोधी पथकाने मनीकर्ण पोलीस स्टेशन हद्दीतील पुलगा, जरी, कुल्लू या पहाड़ी वस्तीमध्ये दिनांक २३ ऑगस्ट रोजी रात्री होटेल व घरे तपासले असता पहाटे ४ वाजता विकास विनय नायक उर्फ विक्की पंजाबी वय-२९ वर्षे रा.सेक्टर २६, बापुधाम कॉलनी, चंदीगड, राज्य पंजाब यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याला अटक करुन कुल्लू येथील प्रथमवर्ग न्यायालयाने येथे चार दिवस ट्रान्झीस्ट रिमांड घेवुन त्यास नाशिक येथे आणून पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उप आयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त संदिप मिटवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे आदींनी संयुक्तरित्या कामगिरी पार पडली आहे.
