सिंधी सिनेमा “आखरी ट्रेन”….. सुभाष हाई स्कूल मध्ये खास शो……
‘आखरी ट्रेन’ सिंधी सिनेमाचा विशेष शो आयोजित करण्यात आला आहे. सिंधी भाषेत तयार झालेला या सिनेमाचा शो देवळाली कॅम्प येथील शंकर एजुकेशन सोसाइटी, डॉ. गुजर सुभाष हाई स्कूल येथे सोमवार 18 अगस्त रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सध्याच्या काळात अनेक सिंधी शाळा बंद जाहले असून सिंधी भाषा शिकण्याची आवड कमी होत चालली असून येणाऱ्या नव्या पिढीला सिंधी भाषेची आवड निर्माण व्हावी म्हणून विविध उपक्रम राबविले जातात. आपण आपल्या मातृभाषा शिकलीच नाही तर ती लुप्त होऊन सिंधी समाज संपुष्टात आली तर आपली ओळख संपेल. सिंधी भाषा संपुष्टात येऊ नये यासाठी समाजातील प्रत्येकाने जबाबदारी ओळखली पाहिजे. प्रत्येकाने सिंधी भाषा ऐकली पाहिजे, बोलली पाहिजे, सिंधी सिनेमा, नाटक, डिजिटल माध्यमातून बघून त्याद्वारे आपली मातृभाषा आणि संस्कृतीशी जुळता येणार आहे. याचाच एक भाग म्हणून देवळाली कॅम्प शंकर एजुकेशन सोसाइटी, डॉ. गुजर सुभाष हाई स्कूल येथे सोमवार 18 अगस्त रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आलेल्या खास सिंधी बांधवांनी अवश्य बघावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे सिंधी समाज सेल राज्य प्रमुख तसेच देवळाली कॅम्प पूज सिंधी पंचायतीचे अध्यक्ष रतन राजलदास चावला यांनी केले आहे.
हा चित्रपट भारताच्या फाळणी आणि त्याच्या वेदनादायक परिणामांबद्दल आहे. हा चित्रपट प्रसिद्ध सिंधी लेखक श्री ठाकूर चावला यांच्या एका प्लॅटोनिक प्रेमकथेवर आधारित आहे. हा चित्रपट मानवी नातेसंबंधांना एका उदात्त पातळीवर घेऊन जाणाऱ्या निरागसतेच्या युगाबद्दल आहे.
भारताची फाळणी ही प्रत्येकासाठी, विशेषतः सिंधी समुदायासाठी, ज्यांनी त्यांची मातृभूमी गमावली आहे, तो हानी आणि निराशेचा काळ आहे. ‘आखरीन ट्रेन – द लास्ट ट्रेन’ ही मालिका दोन निष्पाप आत्म्यांच्या मनात आणि हृदयात खोलवर जाते.