Home ताज्या बातम्या महाकवी वामनदादा कर्डक सांस्कृतिक कला संस्था नाशिकतर्फे, स्वातंत्र्य दिन व महाकवी वामनदादा...

महाकवी वामनदादा कर्डक सांस्कृतिक कला संस्था नाशिकतर्फे, स्वातंत्र्य दिन व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न….

0

महाकवी वामनदादा कर्डक सांस्कृतिक कला संस्था नाशिकतर्फे, स्वातंत्र्य दिन व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न…

नाशिकरोड महाकवी डाँ.वामनदादा कर्डक समिती नाशिक जिल्हा यांच्यावतीने, भारतीय स्वातंत्र्याचे ७९ वर्ष व काव्यसम्राट महाकवी डाँ.वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी महाकवी डाँ. वामनदादा कर्डक स्मारक दसक नाशिकरोड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वप्रथम दिवंगत कलावंत आनंद म्हसवेकर, प्रभाकर पोखरीकर,विष्णूकांत महेशकर, दिनकर शिंदे,कु.चंचल जाधव,वैशाली शिंदे,सार्थक शिंदे,थाँमस केदारे जितेंद्र देवरे,सौ.शैलाताई रंजन जगताप (उन्हवणे),आदी दिवंगत कलावंताच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी पिआरपीचे महाराष्ट्र उत्तर प्रदेशाध्यक्ष तथा गायक गणेशभाई उन्हवणे यांनी लोक कलावंताच्या आर्थिक हितार्थ मानधन मिळण्यासाठी, मार्गदर्शन केले.तसेच पक्षपाती महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंडळ मुंबई येथे धडक मोर्चा काढण्यासाठी,लोक कलावंताना न्याय हक्कासाठी देशव्यापी चळवळ उभी करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.


मी आपणास मानधन मिळवून देतो.मला पाच हजार रूपये दया.अश्या भूलथापा मारून लोक कलावंताना लुटणा-या भामटयांपासुन सावध रहावे. तसेच मानधन निवड समितीवर असणारे काही पदाधिकारी ख-या कलावंताना डावलून,त्यांच्या मर्जीतल्या कलावंताना मानधन मिळवून देतात.आणि खरे कलावंत उपेक्षित राहतात.अश्या पक्षपाती विषमतावादी लोकांपासूनही कलावंतानी सावध रहावे.असा गंभीर इशाराही यावेळी गणेशभाई उन्हवणे यांनी दिला.

पिआरपीचे नाशिक जिल्हाध्यक्ष गायक अँड.शशीभाई उन्हवणे यांनी कलावंतांचे स्वागत केले.अध्यक्षस्थान ज्येष्ठ कवी विष्णू नारायण भटकर,रंगराज ढेंगळे,जयराज उनवणे यांनी भूषविले.सुत्रसंचालनाची धूरा किरण लोखंडे, रविंद्र बराथे, रत्नदीप जाधव यांनी सांभाळली.याप्रसंगी शंकरराव जाधव, संतोष कैलास तेलोरे,मिलिंद निकम, रोहित उन्हवणे, पोपटराव कांबळे,संतोष शिंदे , कु.प्रणाली शिंदे, विश्वास गवळी,बाळाजी चंद्रमोरे, पद्माकर जाधव, दिपक वाघ,संदेश अर्जून जगताप, कैलास सोनवणे, दिनेश, अहिरे,विजयराज पगारे, विजयराज निकम,गुणवंत वाघ, डाँ.भास्कर म्हरसाळे, दिपक शेजवळ कु.अस्मिता गादेकर, नामांतर राजू पगारे,व्यंकटराव जाधव, नंदादीप जाधव, विकास सुकदेव शिंदे,अशोक भालेराव, विशाल मोरे(पाटिल) सुनिल उन्हवणे,यश उन्हवणे,रफिक जलालभाई शेख,रविकांत शार्दुल, बाळासाहेब शिंदे,विजय भोळे,अनिल मनोहर, भगवान गांगुर्डे,आदी महिला पुरूष लोककलावंत यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

राजकिय, सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य,वैद्यकीय,
सांस्कृतिक कला क्षेत्रात आंबेडकरी चळवळीत समाजप्रबोधक कलावंत म्हणून,साहित्य लेख,कविता, बातम्या,गायन,वादन,वकृत्व, नक्कल,विनोद, अभिनय, केशभूषा,वेशभूषा,दिग्दर्शन,नृत्य,शिल्प,चित्र कलेतून आजपर्यंत कलावंत म्हणून निस्वार्थी भावनेने ज्या लोक कलावंतानी अनमोल योगदान दिलेले आहे.त्या उपस्थित लोक कलावंताना “गुण गौरव सन्मान पत्र” प्रदान करून त्यांचा मान सन्मान सत्कार यावेळी करण्यात आला.

तसेच पुढील प्रगतीशिल यशस्वी वाटचालीसाठी लोक कलावंताना अनंत मंगलमय हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली!

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version