
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना जामीन मंजूर….
नाशिकचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना रविवारी 3 ऑगस्ट रोजी सकाळी गुंडा विरोधी पथकाने कांदा बटाटा भवन येथून अटक केली होती.
नॉनबेलेबल वॉरंट असल्याने नरेश कारडा यांना अटक करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
गौतमबुद्ध नगर जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर नाशिकला ही कारवाई करण्यात आली अशी माहिती गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी दिली होती. न्यायालय जिल्हा गौतम बुद्ध नगर अंतर्गत नरेश जग्गुमल कारडा यांच्या वतीने वकिलाने जामीन अर्ज सादर करून कारडा निर्दोष असल्याचे सांगून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे असे सांगितले.
न्यायालयाने जामीन अर्जावरील वकिलांचे म्हणणे ऐकून आणि कागदपत्रांच्या अवलोकनावरून संशयिताला एनबीडब्ल्यू वॉरंटद्वारे अटक करण्यात आली आहे आणि तो न्यायालयीन कोठडीत आहे. सदर खटला जामीनपात्र स्वरूपाचा आहे. त्यामुळे, प्रकरणातील सर्व तथ्ये आणि परिस्थिती लक्षात घेता, जामिनासाठी पुरेसे कारण असल्यामुळे तसेच प्रकरणातील सर्व तथ्ये आणि परिस्थिती लक्षात घेता अटी शर्तींवर नरेश कारडा यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.