Home क्राईम धोंगडे मळा तोडफोड प्रकरणी चार संशयितांना अटक…. उपनगर पोलिस अक्शन मोडवर….. सिनेस्टाईल...

धोंगडे मळा तोडफोड प्रकरणी चार संशयितांना अटक…. उपनगर पोलिस अक्शन मोडवर….. सिनेस्टाईल पाठलाग करीत आरोपींना केले अटक…..

0

 

धोंगडे मळा तोडफोड प्रकरणी चार संशयितांना अटक…. उपनगर पोलिस अक्शन मोडवर….. सिनेस्टाईल पाठलाग करीत आरोपींना केले अटक…..

नाशिकरोड धोंगडे मळा तोडफोड प्रकरणी उपनगर पोलिसांना चार संशयितांना अटक करण्यात यश आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सिनेस्टाईल पाठलाग करीत सहायक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी सुरेश गवळी, विनोद लखन, पंकज करपे, राहुल जगताप, सौरभ लोंढे यांनी संशयित शुभम बेहनवाल उर्फ बाशी, रोशन पवार भय्यू, बेहनवाल मोईज, जावेद शेख या चार जणांना ताब्यात घेतले आहे. उपनगर पोलिस ऍक्शन मोडवर असून बोधले नगर खून प्रकरणी चार, विहीतगाव तोडफोड प्रकरणी दोन आरोपींना तात्काळ अटक केल्यानंतर आता काही तासांतच धोंगडे मळा राजलक्ष्मी हॉल जवळ झालेल्या तोडफोड प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

धोंगडे मळा येथे राजलक्ष्मी हॉल परिसरात चार ते पाच वाहनांची तलवारी आणि कोयत्याने काचा फोडून गुंडांनी दहशत निर्माण केली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version