बिटको महाविद्यालयात हिंदी विभागातर्फे विद्यार्थी स्वागत समारंभ उत्साहात संम्पन्न……
नाशिकरोड :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात हिंदी विभागात वरिष्ठ महाविद्यालयातील प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थी स्वागत समारंभ उत्साहात साजरा झाला.
याच कार्यक्रमात मुन्शी प्रेमचंद यांची जयंतीही साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांनी साहित्यातील मुन्शी प्रेमचंद यांचे महत्व विशद करून ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या विविध हिंदी चरित्रसाहित्य यांचा वाचन व अभ्यास करावा असे सांगितले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक हिंदी विभागप्रमुख डॉ. अजीनाथ नागरगोजे सर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सीमा जाधव व आभार प्रदर्शन डॉ. संगीता देशमुख यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रेमचंद विषयी आपले मनोगत व्यक्त करून महाविद्यालयातील वर्षभरातील उपक्रम व अनुभव असे कथन केले.
यामध्ये प्रामुख्याने अलिझा शेख, शुभम पाल, नेहा आदी विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक चंद्रकांत तारु सर, प्रा. आरोटे , श्री महेश टोचे , डॉ. उत्तम करमाळकर श्री. बिराजदार, अनिल गोरे आदी उपस्थित होते.
