पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्रजी कवाडे सर कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जेल रोड या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गणेश उन्हवणे जयंती निमित्ताने अभिवादन केले.
अण्णा भाऊंच्या कार्याची महती सांगताना ते म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांचे लिखाण हे गोरगरीब कष्टकरी जनतेच्या मनात ऊर्जा निर्माण करणार होता,तसेच जग बदल घालूनी घाव मज सांगून गेले भीमराव, ह्या एका वाक्यात जनतेच्या मनात बाबासाहेबांच्या कार्याचा उल्लेख करून बाबासाहेबांच्या परिवर्तनाच्या चळवळीतची महती आणि निष्ठा त्यांनी त्यांच्या वाक्यातून सांगितली आहे. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष अँड.शशी उन्हवणे ॲड.सागर पगारे,जावेद शेख, नवनाथ कातकाडे, शरद सोनवणे, मुरली काळे, भारत कर्डक, शादाब शेख, बिलाल शेख, नवनाथ माने, निर्मला सोनवणे रवी पगारे यांच्यासह पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.