रतन चावला यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची भेट……
नवीन नियुक्त झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची महाराष्ट्र सिंधी समाज सेल राज्य प्रमुख रतन चावला यांनी भेट घेतली. यावेळी भटी दरम्यान देवळाली कॅन्टोन्मेंट मधील विविध समस्या रतन चावला यांनी मांडल्या.
भेटीत मलनिस्सारण कर (Tax), ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, देवळाली रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबा मिळावा, तसेच देवळाली कॅम्प निवडणुक आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. सदर सर्व समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत पुढील आवश्यक कारवाई करण्याची विनंती यावेळी चावला यांनी प्रदेशाध्यक्ष शिंदे यांना केली.