Home ताज्या बातम्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महसूल आयुक्तांना निवेदन….. बुलढाणा जिल्हाध्यक्ष यांच्यावर हल्ल्याचा निषेध

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महसूल आयुक्तांना निवेदन….. बुलढाणा जिल्हाध्यक्ष यांच्यावर हल्ल्याचा निषेध

0

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महसूल आयुक्तांना निवेदन….. बुलढाणा जिल्हाध्यक्ष यांच्यावर हल्ल्याचा निषेध…..

 

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने 18 जुलै रोजी महसूल आयुक्त कार्यालय नाशिक विभाग यांना निवेदन सादर करण्यात आले. बुलढाणा येथील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे यांच्यावर झालेला जीवघेणे हल्ल्या बाबत निषेध करण्यात आला.


बुलढाणा जिल्हा येथे लोणार तालुक्यातील वेणी या गावी काही समाजकंटकांनी बौद्ध समाजाच्या वस्तीवर हल्ला करून तेथील निळा झेंडा काढून फेकून दिल्यामुळे त्या गावांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी व तेथील दलित मागासवर्गीय समाजाला शांत करण्यासाठी गेले, असता तसेच त्या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर शांततेच्या मार्गाने लोक घरी गेले असताना राजाभाऊ सावळे आणि त्यांचे सहकारी हे माघारी परतत असताना त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकार्यावर पाठलाग करून रस्त्यात अडवून गुंडांनी हल्ला करून राजाभाऊंच्या गाडीची तोडफोड करून त्यांचे जवळचे सहकारी भिकाजी इंगळे आणि गजानन इंगळे यांना लाकडी दांड्याखाली मारून तसेच यांच्या सहकार्यांच्या पायावरून गाडी घालून त्यांच्या पायाला मोठी दुखापत केली.

अशा गावगुंडांनी त्यांना रस्त्यात अडवून राजाभाऊंना विचारणा केली तुम्ही या गावात कशाला आले यावरून हल्ला केला. ह्या सर्व गुंडांचा आम्ही जाहीर निषेध करून मुख्यमंत्री सचिवालय कक्ष येथे निवेदन देऊन तसेच विभागीय महसूल अप्पर आयुक्त अरविंद लोखंडे यांना संबंधित गुंडांवर कडक कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी असे निवेदन प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे, जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे, रवी पगारे, राज निकाळे, गोविंद शिंगाडे, प्रशांत पाटील, नवनाथ काकडे, पक्षाच्या पदाधिकारी यावेळी उपस्थित होते जर लवकरात लवकर संबंधित गुन्हा नाटक जर झाली नाही तर लवकरच पक्षाच्यावतीने महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाणार असल्याचे शशीभाई उन्हवणे यांनी बोलतांना सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version