Home अपघात पाण्यात वाहून आले दोन मृतदेह…. एकाची ओळख पटली…..

पाण्यात वाहून आले दोन मृतदेह…. एकाची ओळख पटली…..

0

पाण्यात वाहून आले दोन मृतदेह…. एकाची ओळख पटली…..

नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी लागोपाठ दोन दिवसांत पाण्यात वाहून आलेले दोन मृतदेह आढळून आल्याच्या घटना घडल्या. त्यापैकी एका मृतदेहाची ओळख पटली आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात दोन्हीही घटनांची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यापैकी एका अनोळखी पुरुषाचा पहिला मृतदेह चेहेडी पंपिंग स्टेशन येथे दारणा नदी पात्रातील पाण्यात मंगळवारी सकाळी सव्वा सात वाजता मिळून आला. नाशिकरोड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. हा मृतदेह दारणा किंवा वालदेवी नदीच्या पूर पाण्यात वाहून आलेला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मृतदेहाची ओळख पटली नाही. दुसरा पुरुष जातीचा मृतदेह पळसे साखर कारखाना रस्त्यावरील सोमय्या नगर येथे कडवा कॅनॉलच्या पाण्यात बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान आढळून आला. शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील गायधनी, सुनील पवार विशाल धोंगडे, दिलीप गायधनी, माधव गायधनी, मुरलीधर मते आदींनी पोलिसांना कळविले. नागरिकांच्या मदतीने कडवा कॅनॉलच्या पाण्यातील मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. हा मृतदेह संतोष हासिम चव्हाण (वय ४५) मूळ रा. मेहकर, जि. बुलढाणा सध्या रा. सोमय्या नगर, पळसे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. संतोष हा त्याच्या बहिणीकडे सोमय्यानगर येथे गेल्या काही वर्षांपासून वास्तव्यास होता आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. रात्री तो जवळच्याच वीट भट्टीवर झोपण्यासाठी गेला होता.

बुधवारी सायंकाळी तो कडवा कॅनॉलच्या पाण्यात मृतावस्थेत आढळून आल्याने त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला याचा शोध घेण्याचे आवाहन आता नाशिकरोड पोलिसांच्या समोर उभे ठाकले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून अधिक तापस वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

नंदू नरवाडे ब्ल्यू स्टार न्यूज पळसे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version