वडाळा गावात बेकायदेशीर गोमांस कत्तलखान्यावर छापा…. इंदिरानगर पोलिसांची कामगिरी…..
इंदिरानगर पोलीसांनी उत्कृष्ट कामगिरी करत वडाळा गावात बेकायदेशीर गोमांस विक्री करणारे व वाहतुक करणारे आणि कत्तलखान्यावर छापा मारून सहा जणांना जेरबंद केले आहे. नाशिक शहरात कोणतेही प्रकारचे गोवंश जातीचे जनावरे कापले जाणार नाही व विक्री होणार नाही तसेच गोवंश जातीचे जनावरे कापणारे व गोमांसची विक्री होणार नाही असे आदेश असताना गोमांस वाहतूक करणाऱ्या इसमांचा शोध घेउन कारवाई करीत असताना इंदिरानगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे सौरभ माळी यांना वडाळागाव, म्हाडा वसाहतीच्या पाठीमागे सादीकनगर नगरकडे जाणा-या रोडच्या लगत असलेल्या एक पत्राच्या घरात गोवंशाची कत्तल करून त्याची वाहनांच्या सहाय्याने वाहतुक केली जाणार असल्याची गुप्त बातमी मिळाल्याने पथकाने कारवाई करीत संशयित नासिर कय्युम शेख वय- ४० वर्षे रा. कसईवाडा, वडाळानाका, नाशिक, अब्दुल रहिम कुरेश वय ३७ वर्षे, रा. कसईवाडा, वडाळानाका, नाशिक, सईद मजिद कुरेशी वय- ३५ वर्षे, रा. नागसेन नगर, वडाळानाका, नाशिक, हसनैन अफरोज कुरेशी वय-१९ वर्षे, रा. कादरी मस्जिदजवळ, बागवानपुरा, नाशिक, अफरोज बिस्मील्ला कुरेशी वय- ५१ वर्षे, रा. कादरी मस्जिदजवळ, बागवानपुरा, नाशिक, रहीम अब्दुल्ला कुरेशी वय ५८ वर्षे, रा. श्रमीकनगर, गंजमाळ, नाशिक यांना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातुन २ इनोव्हा कार, ७ दुचाकी, २०० किलो गोमास असा
एकुण १५,९०,०००/- रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त मोनिका राउत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, इंदिरानगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनिल अंकोलीकर, संतोष फुंदे, परदेशी, सागर कोळी, अमोल कोथमिरे, सौरभ माळी, जयलाल राठोड, सागर परदेशी, दिपक शिंदे, योगेश जाधव, खरोटे, खान, तळपदे, हारपडे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढिल तपास किशोर खरोटे हे करीत आहेत.