Home ताज्या बातम्या नाशिकरोडला जोरदार पाऊस….. पावसामुळे झाड पडले…. सुदैवाने जीवित हानी नाही….. दसक नदीपात्रात...

नाशिकरोडला जोरदार पाऊस….. पावसामुळे झाड पडले…. सुदैवाने जीवित हानी नाही….. दसक नदीपात्रात पाणी पातळीत वाढ……

0
Oplus_16908288

नाशिकरोडला जोरदार पाऊस….. पावसामुळे झाड पडले…. सुदैवाने जीवित हानी नाही….. दसक नदीपात्रात पाणी पातळीत वाढ……

नाशिक शहरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मे महिन्यात सुद्धा झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. हवामान खात्याने जोरदार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Oplus_16908288

शहरात पावसामुळे गुडघाभर पाणी साचल्याचे दिसले. पाणी साचल्यामुळे नागरिकांची आणि दुकानदारांची तारांबळ उडाली. नाशिकरोड भागातील सुभाषरोड मटण मार्केट रोड येथे शुक्रवारी दुपारी झाड कोसळल्याची घटना घडली.

शहर परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे धावपळ होत असताना विद्युत पोल आणि तारांवर हा झाड कोसळले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. परिसरात राहणारे नागरिक थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड मनपा उद्यान विभागाचे, अग्निशमन दल, विद्युत विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन कठोर प्रयत्नांनी झाड काढून बाजूला केले.

विद्युत विभागाने विद्युत पुरवठा बंद करून मनपा कर्मचाऱ्यांनी झाड कापून रस्ता मोकळा केला. झाड पडल्यामुळे विद्युत पोल चे नुकसान झाले आहे. पावसाळ्यात धोकादायक कुजलेले झाडं पाडण्याची भीती असते म्हणून मनपाने धोकादायक झाडे काढण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

नाशिकला जोरदार झालेल्या पावसामुळे
नाशिकच्या गोदावरी नदी पात्रात वाढ झाल्याने दसक नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. अजून काही दिवस जोरदार पाऊस पडण्याची शकतात असून नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version