Home क्राईम खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद…. गुन्हेशाखा युनिट २ ची कामगिरी…..

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद…. गुन्हेशाखा युनिट २ ची कामगिरी…..

0

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद…. गुन्हेशाखा युनिट २ ची कामगिरी…..

खुन्याचे गुन्हयातील दोन महिन्यापासुन फरार असलेला आरोपी गुन्हे शाखा युनिट २ ने जेरबंद केले आहे. १३ एप्रिल रोजी रात्री मित्राची वाट पाहत उभे असतांना फिर्यादी व त्यांचे मित्रांचे मित्र यांच्यात वाद झाल्याने ते भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी हे मध्ये पडल्याने शौकत याने त्याचे जवळील सुरा काढुन राम बोराडे या इसमांस कमरेवर वार करून ठार मारले होते तसेच आरोपी शौकत व रोहित याने त्याचे जवळील सुऱ्याने राजेश याचेवर वार करून त्यास गंभीर जखमी केले होते, तलवारी हातात जोर जोराने फिरवुन प्रिन्स पालवे याने तेथे उभे असलेल्या गाडयांच्या काचा फोडुन दहशत माजवुन प्रिन्स पालवे यांनी हातातील काचेची बाटली फिर्यादी यांचे तोंडावर मारल्याने फिर्यादींच्या ओठाला व दाताला मार लागला होता.

नौशाद व राहुल कुंभार यांनी फित्रा व इतर मित्रांना लाथा बुक्यानी मारहाण केली होती. गुन्हा दाखल केला होता.
गुन्हेशाखा युनिट २ चे पथक फरार आरोपीचा शोध घेत असतांना १३ जून रोजी नंदकुमार नांदुर्डीकर यांना गोपनीय बातमी मिळाली की गुन्हयातील आरोपी नौशाद अजिज सैय्यद मुलानी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार पाथर्डीफाटा परिसरात येथे येणार आहे. गुन्हेशाखा युनिट २ पथकाने मिळालेल्या माहीतीच्या आधारे सापळा लावुन पाथर्डीफाटा टोयाटो शोरूमच्या समोर उड्डाण पुलाखाली याठिकाणी संशयितास ताब्यात घेतले.

सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ चे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर (प्रभारी अधिकारी), सहायक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, पोलिस उप निरीक्षक मुक्तारखान पठाण, सहायक पोलीस उप निरीक्षक गुलाब सोनार, नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश महाजन, वाल्मीक चव्हाण, अतुल पाटील, चंद्रकांत गवळी मनोज परदेशी आदींनी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version