दागिने चोरी करणारा अट्टल चोर जेरबंद…. गुन्हे शाखा युनिट २ ची कामगिरी…..
सोने चांदीचे दागिने विक्री करणाऱ्या अटट्ल चोरास गुन्हे शाखा युनिट २ ने जेरबंद करून घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. ०२ जून रोजी पहाटे ०३:३० वाजता हेडगेवार नगर येथील राहत्या घराचा मागील दरवाजा उघडा असल्याने एकाने घरात प्रवेश करून लोखंडी कपाट उघडुन त्यातील लॉकर मध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने चोरी करून पळून गेला होता. अंबड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना गुन्हे शाखेचे नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश महाजन, मनोज परदेशी यांना एक इसम चोरीचे सोने हेडगेवारनगर येथील अमरधाम जवळ विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने गुन्हेशाखा युनिट २ पथकाने हेडगेवार नगर, उंटवाडी अमरधाम, शिवाजी गार्डनचे बाजुला, नाशिक या ठिकाणी जावुन आरोपीस सापळा लावुन शिताफिने ताब्यात घेतले. स्वप्नील संजय पवार, वय १९ वर्षे, रा. पाटीलनगर, नविन सिडको, नाशिक असे या संशयिताचे नाव आहे.
अंगझडतीत त्याचे ताब्यात सोने व चांदीचे दागिने असा एकूण ३८,३५०/- रूपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला असुन आरोपी याने दिलेल्या कबुलीवरून अंबड पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा उघडकीस आला असुन आरोपी यांस पुढील कारवाईसाठी आरोपीस अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, श्रेणी, पोलिस उप निरीक्षक मुक्तारखान पठाण, सहायक पोलिस उप निरीक्षक बाळु शेळके, शंकर काळे, सुहास क्षीरसागर, संजय सानप, नंदकुमार नांदुर्डीकर, सुनिल आहेर, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, वाल्मीक चव्हाण, मनोज परदेशी, प्रविण वानखेडे, संजय पोटीदे आदींनी केली आहे.