Home ताज्या बातम्या मॉक ड्रिलसाठी नाशिकचीच निवड का ? मॉक ड्रिल दरम्यान काय काळजी घ्यावी...

मॉक ड्रिलसाठी नाशिकचीच निवड का ? मॉक ड्रिल दरम्यान काय काळजी घ्यावी ?

0

मॉक ड्रिलसाठी नाशिकचीच निवड का ? मॉक ड्रिल दरम्यान काय काळजी घ्यावी ?

नाशिक । जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाव हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानही कारवाई कऱण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेता नागरी क्षेत्रात हल्ले झाल्यास नागरीकांनी काय काळजी घ्यावी, सुरक्षेच्या उपाययोजना काय कराव्यात यासाठी केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना उद्या (7 मे) रोजी मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिले आहेत.

 

केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार हायअलर्ट मोडवर आहे. प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख अधिकार्‍यांची बैठक पार पडली. यावेळी भारतीय सैन्य दलाचे अधिकारीही उपस्थित होते.

देशातील 244 सिव्हिल डिफेन्स डिस्ट्रिक्ट (नागरिक सुरक्षा जिल्हे) मध्ये हे मॉक ड्रिल होणार आहे. यामध्ये नाशिकचा सामावेश होतो. म्हणून मॉक ड्रिलसाठी नाशिकचीही निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. मॉक ड्रिल दरम्यान शहरात सायरन वाजणार आहेत. नागरी संरक्षण दलातर्फे या सायरनची चाचणी आज घेण्यात आली. शहरात एकूण ९ ठिकाणी सायरन आहेत. या संदर्भात लवकरच नियमावली जाहीर करण्यात येणार आहे त्यानूसार उद्या त्याची अंमलबजवणी केली जाईल असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले.

शहरात या ठिकाणी आहेत सायरन
जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक बीवायके कॉलेज, नाशिक महापालिका मेनरोड कार्यालय जिल्हा परिषद,नाशिक झाकिर हुसेन रूग्णालय, कथडा
गांधीनगर प्रिटींग प्रेस नेहरूनगर कस्टोडीयन, नेहरूनगर ट्रान्झिस्ट होस्टेल, आयएसपी नाशिकरोड
महापालिका कार्यालय जव्हार मार्केट, नाशिकरोड

सायरन वाजल्यावर काय करावे?

सायरन वाजल्यानंतर घाबरून जाऊ नये

हा एक प्रकारचा अर्लट समजावा मोकळया जागेपासून सुरक्षित जागी पोहचा

घरात किंवा सुरक्षित इमारतीच्या आत प्रवेश करा

खोलगट भागात जावे,घरातील दिवे बंद करावे.

मॉक ड्रिल म्हणजे काय

युध्दजन्य परिस्थितीपूर्वी तयारी

युध्दावेळी काय करावे याची तयारी असते

पक्के बांधकामाच्या ठिकाणी थांबावे.

भिंतीला चिकटून उभे राहू नये

वरच्या मजल्यावर राहत असेल विंडो पॅनला प्लास्टिक कव्हर लावावे.

काचेपासून दूर राहावे

बाथरूमची जागा सर्वात सुरक्षित जागा

महत्वाच्या आस्थापनांवर ग्रीन कव्हर टाकावे

रात्रीच्या हल्ल्यावेळी लाईट दिसले तर टार्गेट दिसते.

यामुळे हल्ला होण्याची शक्यता असते.

लाईट बंद केल्याने स्वतःची सुरक्षा करणे सोयीचे होते.

युध्दजन्य परिस्थितीवेळीच हे मॉक ड्रिल घेतले जातात.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version